Friday, May 31, 2024
Homeनगरबेकायदेशीर मुरूम वाहणारे 5 डंपर पकडले

बेकायदेशीर मुरूम वाहणारे 5 डंपर पकडले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यामध्ये होत असलेल्या बेकायदेशीर मुरूम उपसा बाबत काल महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने कारवाई करत तालुक्यातील आश्वीमध्ये बेकादेशीर मुरूम वाहणारे दोन डंपर संगमनेरमध्ये तीन डंपर पकडले.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरुमाची वाहतूक केली जात आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गौण खनिज उपसाबाबत सक्त आदेश देऊनही या आदेशाचे संगमनेर तालुक्यात पालन होताना दिसत नाही. तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये खुले आम मुरूम उपसा केला जात आहे. याबाबत दैनिक सार्वमत मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

या वृत्ताची गंभीर दखल घेत गौण खनिजाच्या जिल्हास्तरीय पथकाने काल संगमनेर तालुक्यातील मुरूम वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली.तालुक्यातील आश्वी गावात दोन तर शहरामध्ये तीन ठिकाणी अशा पाच डंपरवर कारवाई करण्यात आली. आश्वी मध्ये दोन डंपर तर संगमनेरमध्ये तीन डंपर पकडण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यामध्ये खुलेआम मुरुमाची वाहतूक केली जात असतानाही संगमनेर येथील महसूल अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे जिल्हास्तरीय पथकाने या मुरुमावर कारवाई केल्याने महसूलचे स्थानिक प्रशासन काय करते? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या