Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमपाथर्डीत माव्याच्या अवैध विक्रीवर कारवाई

पाथर्डीत माव्याच्या अवैध विक्रीवर कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह एक आरोपी पकडला

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी|Pathardi

पाथर्डीत माव्याच्या अवैध विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कारवाई करून एकाला अटक केली आहे. शासनाने बंदी घातली असतानांही काही ठिकाणी मावा विक्रीचा अवैध व्यापार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिकच्या पथकाने पाथर्डी येथे छापा टाकून बंदी असलेला मावा विक्री करणार्‍या अली ऊर्फ अर्षद इकबाल पठाण (वय 20, रा. मेहेरटेकडी) रंगेहात पकडले. पठाण हा पाथर्डी शहरातील माणिकदौंडी रोडवरील एका शाळेजवळ प्लॅटीना दुचाकीवरून तयार माव्याच्या पुड्यांची विक्री करत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

- Advertisement -

कारवाईदरम्यान आरोपीकडून माव्याच्या पुड्या, दुचाकी असा 31 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मावा हा प्रतिबंधित खाद्यपदार्थ मानवी आरोग्यास घातक असून शासनाने त्यावर बंदी घातली आहे. तरीही आरोपीकडून विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने गुन्हे शाखेने पंचांच्या उपस्थितीत मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक हरीष भोये, हवालदार सुरेश माळी, सोमनाथ झांबरे, आकाश काळे, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर आदींचा समावेश होता.

YouTube video player

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी अली ऊर्फ अर्षद इकबाल पठाण याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव करीत आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...