Wednesday, April 9, 2025
Homeनगरश्रीरामपूर : अवैध वाळू उपशावर धडक कारवाई

श्रीरामपूर : अवैध वाळू उपशावर धडक कारवाई

आठ ट्रॅक्टरसह जेसीबी ताब्यात, चौघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण परिसरात पोलीस प्रशासनाने अवैधपणे सुरु असलेल्या वाळू उपशाविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत आठ ट्रॅक्टर, एक जेसीबी मशिन सह 54 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात वाळू उपशाविरोधात मोठी कारवाई झाल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. 8 एप्रिल रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना गुप्त बातमीदारामार्फत मातुलठाण शिवारात गोदावरी नदी पात्रातून काही इसम ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरून अवैधरित्या वाळू वाहतूक करणार असल्याबाबतची माहिती मिळाली.

- Advertisement -

त्यानुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे परि. पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस नाईक सचिन धनाड, रामेश्वर वेताळ, सुनील दिघे तसेच तालुका पो.स्टे. चे पोसई सतीश डौले, संदीप मुरकुटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत रननवरे, विनोद कुदनर यांचे पथक तयार करुन मातुलठाण येथे रवाना झाले. मातुलठाण शिवारात पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहिती प्रमाणे काही इसम ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रातून वाळुचा चोरुन उपसा करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी एक जेसीबी, आठ ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळुने भरलेले व दोन मोटारसायकली याप्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस पथकाची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर व जेसीबी वरील ड्रायव्हर साधने नदीपात्रात सोडून पळुन जाऊ लागले. परंतू पोलीस पथकाने त्यातील तीन ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर व एक जेसीबी चालक अशा चार जणांना त्याब्यात घेतले. त्यांना त्यांची नावे विचारली असता आकाश अभिमन्यू ठोंबरे (वय-20, रा. पुरणगाव), अतीश दत्तु रोठे (वय-20 रा. हिंगोणी, ता. वैजापूर), गणेश कैलास पवार (वय-24 रा. लाखगंगा), व एक जेसीबी चालक सुमित धर्मराज ठोंबरे (वय -19, रा. पुरणगाव) असे सांगितले.

अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय व तालुका पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत 54 लाख 60 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर संपतराव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 303(2), 3(5) सह पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याते पोसई संदीप मुरकुटे करत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, तालुका पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली परि. पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या उपस्थितीत अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस नाईक सचिन धनाड, रामेश्वर वेताळ, सुनिल दिघे तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोसई सतिष डौले, संदीप मुरकुटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत रननवरे, विनोद कुदनर, होमगार्ड सागर कोळपे, राम मोरे यांनी पार पाडली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शाळेत मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ दाखवून मुलीची छेडछाड

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षकाने मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ दाखवून छेडछाड केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात शिक्षकावर पोक्सो व अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल...