राहाता |प्रतिनिधी| Rahata
राहाता (Rahata) तालुक्यातील पुणतांबा (Puntamba) येथे बेकायदा वाळूच्या साठ्यावरून (Illegal Sand Stock) शनिवारी वाळू तस्करामध्ये तुफान हाणामार्या (Sand Smuggler Beating) झाल्या. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून जखमींवर शिर्डी (Shirdi) व श्रीरामपूर (Shrirampur) येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.
योगीराज चांगदेव महाराज मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या अनाधिकृत वाळूच्या साठ्यावरून या हाणामार्या झाल्या आहेत. मारामारीमध्ये दोन्ही गटाचे मिळून 35 ते 40 जण हातात दडुंके घेऊन दिसेल त्याला मारहाण (Beating) करत होते. अचानक बाचाबाची व नंतर मारामार्या सुरु झाल्यामुळे अनेक जण जीव मुठीत घेऊन पळून गेले. विशेष म्हणजे हा प्रकार सुरु झाल्याचे लक्षात येताच महसूलच्या अधिकार्यांनी तेथून काढता पाय घेतला. पुणतांबा पोलीस (Puntamba Police) दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी घटना स्थळी हजर असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्या अधिकार्यांची सेवा खंडीत करणार
तसेच घटना समजताच राहात्या वरून तातडीने ज्यादा बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलीस गाड्या दिसताच अनेकांनी पळ काढला. गोदावरी नदीतील बेकायदा वाळू उपशामुळे (Illegal Sand Mining) पुणतांबा (Puntamba) येथे या व्यवसायात अनेक जण उतरले आहे. त्यातून अनेक गट तयार झाले आहे.त्यांना महसूल व पोलिस अधिकार्यांचा वरद हस्त लाभला आहे. त्यामुळे पुणतांबा (Puntamba) येथे गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. या ठिकाणी सर्वच अवैध धंद्यानी चांगलाच जम बसविला आहे. पोलीसांचा धाक नसल्यामुळे कुणी कुणाला जुमानत नाही. त्यातूनच असे प्रकार घडत आहे.
गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असल्यामूळे सर्व सामान्य ग्रामस्थ भयभित झालेले आहे.पुणतांबा पोलीस स्टेशनला पोलीसांची संख्या वाढवून खमक्या अधिकार्याची नेमणूक करून गावातील गुंडगिरी तातडीने मोडून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. तस्करांच्या हाणामारीची पोलीस यंत्रणा काय भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. पुणतांबा (Puntamba) येथील अवैध धंदे व वाढती गुंडगिरी याकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना भेटणार आहे.
वांबोरी उपबाजारात कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर झेडपीत 937 रिक्त जागांसाठी भरती