Sunday, May 4, 2025
Homeक्राईमShrigonda : अवैध वाळू चोरी, वाहतुकीविरुध्द कारवाई

Shrigonda : अवैध वाळू चोरी, वाहतुकीविरुध्द कारवाई

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील बेलवंडी येथे अवैध वाळू चोरी, वाहतुकीविरुध्द शनिवारी (दि.3) कारवाई करुन पोलिसांनी ढंपर व वाळु असा एकूण 20 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालक सत्यम पारस पवार (वय 23, रा.नारायणगव्हाण, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सत्यम पवार व रोहित सुनिल धावडे (रा.चिंचणी, ता.शिरूर, जि.पुणे (फरार) हे ढंपरमधुन हंगेवाडी ते बेलवंडी रोडवर वाळुची चोरून वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या सूचनेनूसार पोलिस पथकाने पिसोरा गावच्या शिवारात हंगेवाडी ते बेलवंडी रोडवर सापळा लावला. दोन ढंपरांना थांबण्याचा इशारा केला असता एक चालक ढंपर न थांबविता निघुन गेला. दुसर्‍या ढंपरमध्ये वाळू आढळून आली. ताब्यात घेतलेला चालक सत्यम पवार याच्याकडे चौकशी केली असता त्याने ढंपर सुनिल भिमराव धावडे (रा.चिंचणी, ता.शिरूर, जि.पुणे (फरार) याच्या मालकीचे असल्याचे व ढंपरचालकाचे नाव रोहीत सुनिल धावडे असल्याचे सांगितले. पोलिसांनी ताब्यातील आरोपीकडून 20लाख रुपये किमतीचा ढंपर व 50 हजार रूपये किंमतीची वाळु असा एकूण 20 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश लोंढे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, मनोज लातुरकर व उमाकांत यांनी केली. पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

तालुक्याच्या संरक्षणाचे आमदारकीचे कवच जनतेने घालविले – थोरात

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने चाळीस वर्षे काम केले. दुष्काळग्रस्तांसाठी धरण व कालवे पूर्ण केले. आपला तालुका, विविध सहकारी संस्था यांना...