Saturday, July 27, 2024
Homeनगरअवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील मढी फाटा येथे अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून त्यावर कारवाई केली. यात एका आरोपींसह 5 लाख 10 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, देर्डे फाटा ते कोळपेवाडी जाणारे रोडने मढी रस्त्यावर निळे रंगाचा ट्रॅक्टर विनापरवाना वाळुने भरुन येणार असल्याचे समजले.यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबलेले असतांना एक विना नंबरचा पॉवरट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर त्यास दुचाकी ट्रॉली येतांना दिसली. पथकाने ट्रॅक्टर थांबविला. ओळख सांगुन ट्रॅक्टरचे ट्रॉलीची पाहणी करता त्यामध्ये वाळु असल्याची खात्री झाल्याने सदर चालकास वाळु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस केली असता त्याने शासनाचा वाळु वाहतुकीचा परवाना नसले बाबत सांगितले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने तुषार राजेंद्र रोकडे, रा. माहेगांव देशमुख, ता. कोपरगांव असे सांगुन गणेश काटे, विकी सरोदे दोन्ही रा. कोपरगांव यांचे सांगणेवरुन सदरची वाळू गोदावरी नदीपात्रातुन उत्खनन करुन आणलेली असुन गणेश काटे व विकी सरोदे हे दोघे वाळु धंद्यामध्ये पार्टनर असल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीने अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैधरित्या चोरी केल्याने पाच लाख दहा हजार रुपये किंमतीचा एक निळे रंगाचा पॉवरट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर त्यास पाठीमागे निळे रंगाची दुचाकी ट्रॉली व एक ब्रास वाळुसह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द कापरगांव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 451/ 2023 भादविक 379, 34 सह पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या