Tuesday, September 22, 2026
Homeक्राईमअवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

पाथर्डीत 40.40 लाखांचा मुद्देमाल जप्त || जेसीबी चालक ताब्यात, मालक फरार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत जेसीबी चालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत जेसीबी, विनाक्रमांकाचा डंपर आणि वाळूसह एकूण 40 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, रणजीत जाधव, अमोल कोतकर आणि सतीश भवर यांचे पथक तयार केले होते. 20 सप्टेंबर रोजी पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती घेत असताना पथकाला नारायण बोरूडे (रा. पाथर्डी) हा बोरूडे मळा येथे जेसीबीच्या सहाय्याने डंपरमध्ये वाळू भरून वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

- Advertisement -

त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला असता जेसीबीच्या सहाय्याने डंपरमध्ये वाळू भरली जात असल्याचे आढळून आले. यावेळी जेसीबी चालक उमेश विष्णू कचरे (वय 22, रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले. वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. तसेच जेसीबी व डंपरचा मालक नारायण बोरूडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बोरूडे मळा, ता. पाथर्डी) याच्या सांगण्यावरून वाळू वाहतूक करीत असल्याचे त्याने सांगितले.

नारायण बोरूडे फरार आहे. कारवाईत 25 लाख रुपये किमतीचा जेसीबी, 15 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा विनाक्रमांकाचा डंपर आणि 40 हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण 40 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेचा लवकरच निवडणूक कार्यक्रम

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष...