पारनेर |प्रतिनिधी| Parner
खडकवाडी ते कामतवाडी रस्त्यावरून मालवाहू छोटा हत्ती या गाडीतुन अवैध रित्या बेकायदा वाळूची चोरटी वाहतूक करताना पारनेर पोलीसांनी सापळा रचुन कारवाई कली. यात वाळू व वाहन असा दोन लाख 5 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अधारे पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर लोढे, पोलीस नाईक भालचंद्र दिवटे , पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सागर तोरडमल या कर्मचार्यांना खडकवाडी ते कामतवाडी रस्त्यावर सापळा लावून पथकातील कर्मचार्यांनी सापळा लावला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास खडकवाडीकडुन एक पिवळ्या रंगाचा जितो छोटा हत्ती (क्र. एमएच 16 सीसी 6291) हे संशयित वाहन येताच पोलीसांनी त्यास थांबवून या वाहनाचे मागील ताडपत्री हटवली असता वाहनाचे मागील बाजुस वाळू भरल्याचे मिळून आले.
याप्रकरणी भाऊसाहेब मनोहर हारदे (रा. हारदेवस्ती , मांडवेखुर्द , ता पारनेर जि अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या ताब्यातून गाडी व एक ब्रास वाळू असा 2 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक साळवे हे करत आहेत.