तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
संगमनेर (Sangamner) भाग 2 वनपरिक्षेत्रांतर्गत (Forest Area) असणार्या संगमनेर तालुक्यातील निमोण (Nimon) येथे वन विभागाच्या (Forest Department Officers) अधिकारी व कर्मचार्यांनी कारवाई करीत अवैध लाकूड वाहतूक (Illegal Timber Transport) करणार्या 3 पिकअप व एक ट्रक (Truck) अशा 4 वाहनांवर कारवाई करीत साहित्य जप्त (Seized) केले. ही शनिवारी (दि. 17) कारवाई करण्यात आली. सदर कारवाई 52 घनमीटर निम व इतर प्रजातीचे लाकूड हस्तगत करण्यात आले. दोन वखारीमधून हे लाकूड (Timber) भरण्यात येत होते.
दोन कंटेनरच्या अपघातात चालक ठार
संगमनेर (Sangamner) भाग 2 वनपरिक्षेत्रांतर्गत असणार्या निमोण (Nimon) शिवारातील नांदूरशिंगोटे-लोणी राज्यमार्गालगत (Nandurshingote -Loni Highway) सिटीजन वेब्रिज नजिक अवैधरित्या लाकूड वाहतूक, साठवणूक व कटाई चालू असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्या नेतृत्वाखाली वनपाल व्ही. डी. जाधव, एस. बी. ढवळे, वनरक्षक श्रीमती आर. एम. दिघे, एस. एम. पारधी, डी. आर. कडनर, व्ही. आय. जारवाल यांच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली.
आता बैलांचे वेदनामुक्त खच्चीकरण!
सदर कारवाई दरम्यान 52 घनमीटर निम व इतर प्रजातीचा लाकूड (Timber) असा मुद्देमाल मिळून आला. सदर मालाची अवैध वाहतूक (Illegal Timber Transport) 3 पिकअप व एका ट्रकद्वारे करण्यात येत असल्याचे उघड झाले. हे लाकूड माल दोन वखारीमधून भरण्यात येत असल्याचे दिसून आले. प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 नुसार कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यातील लाकडासाहित वाहने व इतर सामान जप्त (Seized) करण्यात आले.
‘त्या’ प्रकरणातील आरोपींचा अन्य मुलींसोबत संपर्क नाही – डीवायएसपी वाघचौरे
अधिक चौकशी वनपाल व्ही. डी. जाधव करीत आहेत. अशा प्रकारची लाकडाची अवैध वाहतूक (Illegal Timber Transport), साठवणूक वा कटाई करताना कुणीही आढळल्यास, वनविभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा संगमनेर (Sangamner) भाग 2 वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी दिला आहे.
मुळाधरणाच्या विज प्रकल्पा जवळील कालव्यात तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू