Saturday, May 4, 2024
HomeजळगावVideo रांगोळीतून साकारली शिवाजी महाराजाची प्रतिमा

Video रांगोळीतून साकारली शिवाजी महाराजाची प्रतिमा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्ताने चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांना यांना मानवंदना देण्यासाठी येथील (Rangoli) रांगोळी कलाकार कावेरी शांताराम पाटील (Kaveri Shantaram Patil) यांनी तब्बल १९ तासांच्या अर्थक परिश्रमातून शिवाजी महाराजांची तब्बल ८ बाय ६ आकाराची भव्य रांगोळी साकारली आहे. यासाठी ७ किलो रांगोली लागली आहे.

- Advertisement -

शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेला डौलदार फोटो रांगोळी स्वरूपात साकारलेला आहे. ही रांगोळी शनिवारी (दि,१९) शिवजयंतीच्या दिवशी कलाप्रेमींना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे. (Kailash Nagar Mahadev Temple) कैलास नगर महादेव मंदीर जवळ (स्वयंभू प्रतिष्ठान) येथे संकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत रांगोली पाहता येणार आहे. कलाकार कावेरी शांताराम पाटील या दरवर्षी शिवजयंती रांगोलीतून महराजांना मानवंदना देतात. त्यांच्या या उपक्रमांचे दरवर्षी शहातून कौतूक होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या