Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रRain Alert : राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना यलो...

Rain Alert : राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई | Mumbai

बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, संपूर्ण ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. पावसाने दडी मारल्याने बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलं होतं. तसेच धरणातील पाणी साठा सुद्धा कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उभा राहिला होता. पण आता पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच २१ जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशाराही देण्यात आला आहे.

- Advertisement -

हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या हवामानाबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पुढील चार- पाच दिवस राज्यात मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे मुख्यतः मेघगर्जना सरींशी संबंधित असेल, अशी त्यांनी माहिती दिली. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीत एकूण २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

3 सप्टेंबर

 • कोकण – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

 • मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

 • मराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

 • विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

4 सप्टेंबर

 • कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

 • मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

 • मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

 • विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

5 सप्टेंबर

 • कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

 • मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

 • मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

 • विदर्भ – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

6 सप्टेंबर

 • कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

 • मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

 • मराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

 • विदर्भ – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज

 • 2 सप्टेंबर – आकाश सामान्यत: ढगाळ राहुन दुपारी / संध्याकाळी पूर्णत: ढगाळ राहण्याची शक्यता. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)

 • 3 सप्टेंबर – आकाश सामान्यत: ढगाळ राहुन दुपारी / संध्याकाळी पूर्णत: ढगाळ राहण्याची शक्यता. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता)

- Advertisment -

ताज्या बातम्या