पुणे | Pune
सध्या महाराष्ट्रात पावसाने (Rain) थैमान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सामान्य नागरिकांना पुराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आता पावसाबाबत पुणे वेधशाळेने (IMD Pune) एक नवा अंदाज वर्तवला आहे…
या अंदाजानुसार महाराष्ट्रात आजपासून पुढील काही दिवस पाऊस (Rain) उघडीप देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 17 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र पावसाचे प्रमाण असमान आहे. नाशिक, अहमदनगर, सांगली, सातारा, जालना, अमरावती या जिल्ह्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या 15 टक्के जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस झाला आहे. कोकण, गोव्यात सरासरीच्या 36 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात; पाच ठार, 25 जण गंभीर
दरम्यान, आज राज्यातील कुठल्याही जिल्ह्याला पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र ठाणे, पुणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Video : गंगापूर धरणातून यंदाचा पहिला विसर्ग सुरु, नाशिकला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षाच