Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमविद्यार्थीनीवर अत्याचार प्रकरणी शिक्षक व मुख्यध्यापकाचे तातडीने निलंबन- शिक्षण मंत्री भुसे यांचे...

विद्यार्थीनीवर अत्याचार प्रकरणी शिक्षक व मुख्यध्यापकाचे तातडीने निलंबन- शिक्षण मंत्री भुसे यांचे निर्देश

इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थीनीसोबत मुख्यध्यापकाने वर्गशिक्षकाच्या मदतीने अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

या प्रकरणातील दोषी शिक्षक व मुख्यध्यापकावर भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर तातडीने मुख्याध्यापक तुकाराम साबळे वर्गशिक्षक गोरख जोशी या संशयित आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेची गंभीरपणे दखल घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दोन्ही आरोपींना सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले असून यानुसार कार्यवाही करत शिक्षक व मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्याचा गंभीरपणे तपास करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पोलिस अधिक्षक नाशिक यांना मंत्री भुसे यांनी दिले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...