Monday, July 22, 2024
Homeजळगावअन् तोतया जिल्हाधिकारी झाला पसार

अन् तोतया जिल्हाधिकारी झाला पसार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

लाल दिवा असलेल्या गाडीने वाळूची वाहतुक करणारे डंपर अडविले. गाडीत कलेक्टर साहेब बसले असून डंपर सोडविण्यासाठी तीस हजार रुपये दे.. असे म्हणत तोतया (impersonate Collector) जिल्हाधिकार्‍याने नावानेच डंपरचालकाकडे (dumper driver)तीस हजारांचा हप्ता (Installment) मागितल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दूरदर्शन टॉवर परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले होते, परंतु दुसर्‍या दिवशी कुठल्याही प्रकारचा गुन्हा(crime) दाखल झालेला नव्हता.

शिंदे-फडणवीस सरकारबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी केला मोठा दावा…

पुणे येथील तरुणाने सोबत आणलेल्या (एमएच 12 एलपी 8682) क्रमांकाच्या अलिशान इनोव्हा कारवर लाल दिवा चढविला. त्यानंतर शहरातील दोघ मित्रांना सोबत घेवून त्याने महामार्गावरुन भुसावळकडे जाणार्‍या वाळूची वाहतुक करणार्‍या डंपरला दूरदर्शन टॉवरजवळ थांबविले. चालकाने लाल दिवा असलेली गाडी पाहिल्यानंतर डंपर थांबविले. डंपर थांबविणार्‍या दोघांनी डंपरचालकाला गाडीत कलेक्टर साहेब बसले आहेत… त्यांनी ही कारवाई केली असून डंपर सोडविण्यासाठी तीस हजार रुपये लागलीत असे त्यांनी सांगितले. डंपरचालक हा दोघांना वीस हजार रुपये देण्यास तयार झाला होता. परंतु ते दोघ तोतये तीस हजारांवर अडून बसले होते. काही वेळातच याठिकाणी वाहन चालकांची गर्दी जमू लागल्याने लाल दिव्या गाडीतून आलेल्या तोतया जिल्हाधिकार्‍यांसह दोघांनी त्याठिकाणाहून शहराच्या दिशेने त्यांनी पळ काढला.

कुशीनगर एक्सप्रेसच्या जनरल डब्याला आगमहामार्गाच्या ठेकेदाराच्या चुकीचा आयशर चालक ठरला बळी

महसूलमधील अधिकार्‍यांनी केली खातरजमा

जिल्हाधिकारी आज कारवाई करीत आहेत का? अशी विचारणा वाळू व्यावसायीकाने थेट महसूलमधील अधिकार्‍यांना केली. परंतु जिल्हाधिकार्‍यांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याची खातरजमा झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने हप्ता मागणारे ते तोतया असल्याचे कळताच सर्वांना धक्काच बसला. त्यांनी लागलीच घटनेची माहिती पोलिसांना दिली.

अन् तोतया जिल्हाधिकारी झाला पसार

डंपरचालकाकडे हप्ता मागणार्‍या दोघांना अवघ्या तासभरातच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी हा प्रकार पुणे येथून आलेल्या मित्रासोबत केल्याची कबुली दिली. प्रकार घडल्यानंतर तोतया जिल्हाधिकारी मित्राने त्यांना घरी सोडले आणि तो कार घेवून निघून गेला.

ताब्यात घेतलेल्यांना दिले सोडून

घटनेची माहिती महसूलमधील अधिकार्‍यांना मिळाली होती. परंतु त्यांच्याकडून पोलिसात कुठल्याही प्रकारची तक्रार दिली नसल्याने पोलिसांनी त्या दोघांना समज देवून सोडून दिले. याप्रकरणी दुसर्‍या दिवशी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

भडगाव शहरासह तालुक्यात सर्रास अवैध वृक्षतोड
सावधान… केळी पिकावर औषध फवारणी करण्यापुर्वी ही बातमी अवश्य वाचाच…यावलला 14 आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा

- Advertisment -

ताज्या बातम्या