Saturday, September 14, 2024
HomeUncategorizedप्रधानमंत्री आवास योजना गतीने राबवा- राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

प्रधानमंत्री आवास योजना गतीने राबवा- राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

औरंगाबाद – aurangabad

प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) शहरी आणि ग्रामीण भागात गतीने राबविण्यासोबतच याबाबतची कामे गतीने पूर्ण करा अशा सूचना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे (Minister of State for Central Railway Raosaheb Patil Danve) यांनी दिल्या.

- Advertisement -

Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता…

जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी प्रधानमंत्री आवास योजना आणि स्मार्ट सिटी संदर्भात आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महानगर पालिकेचे आयुक डॉ. अभिजीत चौधरी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, महापालिकेच्या उपायुक्त अर्पणा गिते यांच्यासह सर्व नगरपंचायत, नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील घरकुल बांधकाम कामाबाबत आढावा घेत श्री. दानवे म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांकरीता ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि अशी महत्वपूर्ण योजना केवळ तांत्रिक अडचणींमुळे अपूर्ण राहता कामा नये. याबाबत सर्व यंत्रणांनी सकारात्मकदृष्ट्या नागरिकांच्या गरजा ओळखत लाभार्थ्या साठी मेळाव्यांचे आयोजन करावे. प्रधानमंत्री आवास योजनेची सामान्य नागरिकांमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीने काम करावे. योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रकल्पनिहाय मार्ग काढून जास्तीत जास्त घरकुल पूर्णत्वास नेऊन गरीब जनतेला हक्काचे घर मिळवून द्यावे. ज्याठिकाणी प्राथमिक स्तरावर अतिक्रमणाची अडचण असेल तो भाग तात्पुरता वगळून उर्वरित ठिकाणी घरकुलाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी दिल्या.

स्मार्ट सिटीसंदर्भात मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी करण्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा. स्मार्ट बसच्या फेऱ्या या विमानतळ, रेल्वेस्टेशन आदी भागात प्राधान्याने वाढवाव्यात. त्याचबरोबर अजिंठा, वेरुळ अशा पर्यटनास्थळांवर पर्यटकांनी केवळ एक दिवसीय भेट न ठेवता पर्यटक येथे कसे थांबतील यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देत श्री. दानवे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट बस, सफारी पार्क, शिवसृष्टी, पॅन सिटी, एनर्जी ॲण्ड इन्हवायरमेंट सोल्युशन, स्मार्ट सोल्युशन ॲण्ड आयसीटी टेक्नॉलॉजी, सोशल ॲसपॅक्ट, स्मार्ट सिटी मिशन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलीसी आदी विविध विषयाचाही सविस्तर आढावा घेतला. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता…

- Advertisment -

ताज्या बातम्या