Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्यागणपती विसर्जनाबाबत प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

गणपती विसर्जनाबाबत प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जलसंपदा विभागाच्या जलाशयात व धरणांमध्ये शहरातील नागरिक गणपती विसर्जनासाठी (Ganpati Immersion) येतात. गणपती विसर्जनात मुर्ती व निर्माल्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी जलाशयात व धरणांमध्ये गणेश विसर्जन करू नये, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे (Sagar Shinde) यांनी केले आहे…

- Advertisement -

जलसंपदा विभागाच्या जलशय व धरणांमधील पाणी शहरासाठी तसेच धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना पिण्यासाठी वापरण्यात येते. गणपती मुर्तींच्या विसर्जनामुळे व निमार्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

२८ लाखांची लाच घेणाऱ्या अभियंत्याला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

तसेच जलाशयातील खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जिवीतहानीच्या घटना देखील घडत असतात. जलाशयाच्या लगतच्या भागात वायुप्रदूषण व ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या तक्रारीही ग्रामपंचायतींनी केल्या आहेत.

नाशकातील लाचखोरावर पोळ्याच्या दिवशी ‘संक्रांत’; जीएसटीचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

जलसंपदा विभागाचा धरणांचा परिसर हा अतिसंवेदनशील असल्याने धरणांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेस बाधा पोहोचू नये याकरिता जलशयामध्ये व धरणांमध्ये गणेश विसर्जन करण्यात येवू नये, असे आवाहन जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या