Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशHMPV विषाणूची लागण झालेल्या भारतातील रुग्णांबाबत केंद्र सरकारची महत्त्वाची माहिती

HMPV विषाणूची लागण झालेल्या भारतातील रुग्णांबाबत केंद्र सरकारची महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रातील आरोग्य विभागही झाला सतर्क

नवी दिल्ली | New Delhi

चीनमध्ये (China) मोठ्या प्रमाणावर सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असून या व्हायरसच्या अनुषंगाने भारतातही (India) दोन रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात असून या संसर्गासंबंधी केंद्र सरकारने (Central Government) काही महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच भारतातील या व्हायरससंबंधी परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) निवेदन जारी केले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”एचएमपीव्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासूनच प्रसारित झाला आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या संक्रमणावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही याची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. या दोनही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही त्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून वेगवेगळ्या इन्फ्लूएंझा विषाणूंसह RSV यासारख्या श्वसनासंबंधीत संसर्गाचा डेटा गोळा केला जातो. या डेटानुसार, गेल्या महिन्यात, इन्फ्लूएंझा बी व्हिक्टोरिया वंश आणि RSV हे आढळून आलेल्या श्वसन संक्रमणाचे मुख्य कारण होते.तर भारतात एचएमपीव्ही या संसर्गाचे रुग्ण गुजरातच्या अहमदाबाद आणि कर्नाटकच्या बेंगळुरूमधील बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये सापडले आहेत. त्यात एका तीन महिन्याच्या मुलीचा आणि आठ महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. दोन्ही मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली होती, त्यानंतर सध्या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला असून मुलावर उपचार केले जात आहेत आणि तो बरा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सतर्क

भारतात एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) अलर्ट मोडवर असून आरोग्य विभागाने त्या संबंधी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि.०७) रोजी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. तसेच जनतेने घाबरून जाऊ नये, या व्हायरससंबंधी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये एचएमपीव्ही विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा होणार आहे. तसेच सर्वसामान्यांमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे यासंदर्भात देखील चर्चा होणार आहे.

एचएमपीव्ही व्हायरसची लक्षणे काय आहेत?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे.प्रामुख्याने लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती या व्हायरसच्या विळख्यात अडकतात. तसेच, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराची गंभीर लक्षणे दिसू शकतात. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लागण टाळण्यासाठी काय करावं?

१) खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
२) साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.
३) ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
४) भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.
५) संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्यावी.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...