मुंबई | Mumbai –
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) बुधवारी अभिनेत्री कंगना राणावतचे कार्यालयाची तोडफोड केल्याच्या घटनेचा इम्पा या भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने
- Advertisement -
निषेध केला आहे. ही कारवाई नियमबाह्य असून ती ना सरकारसाठी ना अभिनेत्री कंगनासाठी चांगली आहे असे इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने (इम्पा) म्हटले आहे.
महाराष्ट्र शासन किंवा बीएमसीने केलेली कारवाई एकदम चुकीची आहे व आम्ही त्याचा निषेध करतो, असे संघटनेचे अध्यक्ष टी.पी. अग्रवाल यांनी म्हटले आहे. कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यापूर्वी तिला स्पष्टीकरण देण्यासाठी किमान वेळ तरी द्यायला हवा होता. जर कंगनाच्या घराचे बांधकाम नियमबाह्य असेल, तर पाडा, परंतु केवळ कंगनाचेच घर, कार्यालय का? असा सवालही त्यांनी केला.