Monday, June 9, 2025
Homeदेश विदेशप्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा

प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा

नवी दिल्ली |New Delhi –

- Advertisement -

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची अशी माहिती त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी रविवारी सकाळी ट्विटद्वारे दिली. तर प्रकृती स्थिर असली तरी अद्याप प्रणव मुखर्जी यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलने दिली आहे. Former President Pranab Mukherjee

84 वर्षीय माजी राष्ट्रपतींवर 10 ऑगस्टला मेंदू शस्त्रक्रिया झाली होती, यावेळी त्यांच्या मेंदूमधून रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा करोनाचा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, 13 ऑगस्टला प्रणव मुखर्जी कोमात गेले असल्याचे रुग्णालयाने सांगितले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : कानशिलात थापड मारल्यानं पेव्हर ब्लॉकवर पडून एक ठार

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स लगत मध्यरात्री झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून पाकीट चोरल्यानंतर चोरट्यांनी त्या व्यक्तीच्या कानशिलात जोरदार चापट मारल्याने ती व्यक्ती पेव्हर...