Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्याअंदमानात मिळणार देशसेवेची स्फूर्ती

अंदमानात मिळणार देशसेवेची स्फूर्ती

नवी दिल्ली । सुरेखा टाकसाळ New Delhi

- Advertisement -

देशाच्या रक्षणार्थ अतुलनीय साहस दाखवलेल्या व त्याकरिता परमवीर चक्राने सन्मानित 21 शूरवीरांच्या प्रति कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी अंदमान निकोबार द्वीपसमुहातील ( Andaman and Nicobar Islands)21 मोठ्या बेटांना त्यांची नावे दिली जाणार आहेत.आज हा ‘पराक्रम दिवस’आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरंसीद्वारे हा समारंभ होणार आहे.

जीवाची तमा न बाळगता, शत्रुवर हल्ला चढविणार्‍या, सहकार्‍यांचा बचाव करीत स्वत:चे प्राण देणार्‍या या वीरांची कामगिरी ही 21 बेटे कायमस्वरूपी स्मारके म्हणून स्फूर्ती देत राहतील. या 21 शूर पराक्रमी वीरांमध्ये 1948 पासून ते 1999पर्यंतच्या काळातील सैनिक व सेनाधिकार्‍यांचा समावेश आहे.पैकी 14 मरणोत्तर आहेत.

21 वीरांमध्ये, महाराष्ट्रातील रामा राघोबा राणे (बॉम्बे इंजिनिअर्स रेजिमेंट) हे एक आहेत.1948 मध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी, 1962 मध्ये चीनचे आक्रमण, 1965 मध्ये पाकिस्तान बरोबरीची लढाई व 1971 मध्ये पाकिस्तान बरोबर लढाईत बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामगिरी व कारगील मधील कठीण लढाईत शौर्य गाजवलेल्या व असामान्य साहस दाखवलेल्या वीरांपैकी काहींची नावे देशभरात परिचित आहेत.

त्यात जीवावर उदार होऊन पाकिस्तानचे काही रणगाडे उध्वस्त व काही रणगाडे निकामी केलेला अब्दुल हमीद, कारगीलच्या लढाईत 7 जुलै 1999 रोजी सैनिक ठार करून एकट्याने कडा चढून उंचावरील दोन पाकिस्तानी ठाणी काबीज केल्यानंतर धारातिर्थी पडलेला कॅप्टन विक्रम बत्रा,छोट्याशा नॅट विमानामधून पाकिस्तानची दोन भलीमोठी लढाऊ साबरजेट विमाने पाडणारे फ्लाईंग ऑफिसर निर्मलसिंग सेखों यांचा समावेश आहे.अंदमान निकोबार द्वीप समुहातील 21 द्विपांना 21 साहसवीरांची नावे देण्यात येणारआहेत.

हे आहेत शूरवीर

* कंपनी क्वार्टर मास्टर हविलदार अब्दुल हमीद(4 ग्रेनेडिअर्स): खेमकरण सेक्टर (10 सप्टेंबर1965)पाकिस्तानचे काही रणगाडे उद्वस्त व निकामी केले.

* सेकंड लेफ्टनंट अरूण खेत्रपाल (17 पुना हॉर्स ):शकरगढ सेक्टर,जम्मू काश्मीर,(16 डिसेंबर1971)स्वतःच्या रणगाड्यातून हल्ला करत शत्रुचे रणगाडे उध्वस्त केले.

* नायब सुभेदार बाना सिंग( जे के लाईट इंनफंट्री): सियाचीन सेक्टर,1987 मध्ये बंकरमधून पुढे जात जात बायोनेटने पाकिस्तानी अनेक घुसखोरांना मारले.

* मेजर रामस्वामी परमेश्वरन ः श्रीलंकेतील लष्करातील कारवाई दरम्यान 25 नोव्हेंबर 1987 ला श्रीलंकन दहशतवाद्यांनी वेढले असतां व स्वतःला गोळी लागली असतांना देखील रायफलने एका दहशतवाद्यास कंठस्नान घालून प्राण सोडले.

* लेफ्टनंट मनोजकुमार पांडे (गोरखा रायफल्स): 2 ते3 जुलै 1999 कारगील युध्दात बटालिक सेक्टर मधून घुसखोरांना हुसकावून लावले व जौहर पॉइंट काबीज केला.

* योगेंद्र सिंग यादव, (18 ग्रेनेडिअर्स): कारगील युध्दात 3 ते 4 जुलै 1999 टायगर हिलच्या बंकरवर हल्ला केला. 3 गोळ्या लागल्या असतांना देखील 60 फूट कडा चढून वरच्या बंकरवर ग्रेड टाकून 4 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. आपल्या सैनिकांना मार्ग मोकळा केला व मग प्राण सोडले.

* मेजर होशियार सिंग( ग्रेनेडिअर रेजिमेंट): शकरगढ सेक्टर मध्ये 17 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी प्रतिहल्ल्यास तोंड देतांना जखमी झाला. परंतु मशीनगनने हल्ला परतवून लावला. युध्दबंदी जाहीर होईपर्यंत(18 डिसेंबर1987) तेथे टिकून राहिला.

* रायफलमन संजय कुमार(13 जे अ‍ॅन्ड के रायफल्स) * कॅप्टन विक्रम बत्रा.

- Advertisment -

ताज्या बातम्या