धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात दिवसभरात 52 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 50 अहवालांपैकी 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिरपूरातील 11 आणि जळगाव जिल्ह्यातील लासूर, चोपडा येथील एकाचा समावेश आहे. अर्थे येथील दोन, ताजपूरी एक, जनतानगर शिरपूर चार, वरवाडे शिरपूर एक, साईबाबा कॉलनी एक, शिरपूर दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील नऊ अहवालांपैकी टेक भिलाटी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धुळे जिल्हा रुग्णालय येथील 47 अहवालांपैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात तेली गल्ली एक, जुने धुळे एक, अमरनगर दोन आणि सोनगीर एक रुग्णाचा समावेश आहे.
रात्री 8.30 वाजता शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 23 अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात बाळदे, होळनांथे आणि शिरपूर शहरातील रुग्णांचा समावेश आहे.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 11 अहवालांपैकी शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील एकाचा तर भांडणे साक्री सीसीसी येथील 34 अहवालांपैकी दिघावे तानाजीनगर येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
महापालिका पॉलिटेक्निक सीसीसी येथील 21 अहवालांपैकी ग.नं.4 जुने धुळे, अभय कॉलेजजवळ एक रुग्ण आढळला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 75 अहवालांपैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात कासारे, मोगलाई, गोपाळनगर, गोविंद अपार्टमेंट आनंदनगर प्रत्येकी एक, साक्रीरोड व जीएमसी प्रत्येकी दोन आणि धुळ्यात तीन रुग्ण आढळले आहेत.
खाजगी लॅब येथील 25 अहवालांपैकी दहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात बडगुजर प्लॉट, विकास कॉलनी, पवननगर, राजेंद्र सुरीनगर, मोहाडी तिखीरोड, मुंदडा मार्केट, चितोडरोड, कासारे प्रत्येकी एक आणि सुभाषनगर दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1727 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
एसआरपीएफचे 7 जवान पॉझिटिव्ह
धुळे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 चे 150 जवान गडचिरोली येथे बंदोबस्तासाठी गेले होते. त्यापैकी काल 29 जवानांचा तर आज सात जवानांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. 36 जवान कोरोना बाधीत झाले आहेत.
एचडीएफसी बँकेत शिरला कोरोना, तीन दिवस बंद
धुळे शहरातील ग.नं.6 मध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेत कोरोना बाधीत आढळून आला. त्यामुळे खबरदारी म्हणून दि. 15 ते 17 जुलै दरम्यान बँक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.