धुळे – जिल्ह्याच दोन दिवसांपासून नव्याने आढळून येणार्या कोरोना बाधितांच्या रूग्ण संख्येत घट झाली होती. परंतू आज दिवसभरात तब्बल 68 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर एकाचा मृत्यू झाला आहे. रूग्णांमध्ये शिरपूरातील 38, धुळे शहरातील 28 रूग्णांचा समावेश आहे. बाधितांची संख्या 1 हजार 224 वर पोहोचली आहे. त्यापैकी 746 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
दरम्यान शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल मोहाडी उपनगरातील 45 वर्षीय पुरुषाचा आज दुपारी कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हात आतापर्यंत एकूण मृत्यू 62 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात धुळे शहर 30 व ग्रामीणमधील 32 जणांचा समावेश आहे.
दुपारी तीन वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 63 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात खलाणे, शिंदखेडा 1, धुळे जीएमसी 2, सोन्या मारुती कॉलनी 1 व धुळ्यातीलच एका रूग्णाचा समावेश आहे. सायंकाळी साडेसात वाजता शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 70 अहवालांपैकी 36 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात क्रांती नगर 7, अंबिका नगर 7, वकील गल्ली 1, मराठा गल्ली 1, रसिकलाल पटेल नगर 1, स्वामी समर्थ नगर 1, वाल्मिक नगर 1, जनता नगर 1, वरवाडे 3, अजंदे 1, बाळदे 1, करवंद 1, भाटपुरा 5, थाळनेर 1, भटाने 1, तासपुरी 1, एसडीएच शिरपूर 1, शिरपूर 2 तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 7 अहवालांपैकी धुळे शहरातील 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
याबरोबच धुळे शहरातील खासगी प्रयोगशाळेतील अहवालांपैकी 26 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात वर्षी, शिंदखेडा 1, शिरपुर 1, मुकटी 1, नवरंग कॉलनी धुळे 4, जुने धुळे 2, नकाणे रोड 4, दसेरा मैदान 2, मालेगाव रोड 2, गोंदुर रोड, चितोड़ रोड, प्रोफेसर कॉलनी, विद्यानगरी, वाडीभोकर रोड, अकबर चौक, आग्रा रोड प्रत्येकी 1 व इतर धुळ्यातील 2 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण रूग्ण संख्या 1 हजार 224 वर पोहोचली आहे.