नाशिक | प्रतिनिधी
परदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल दोन लाख ३१ हजार ४९५ नाशिककरांनी ‘पासपोर्ट’ नोंदणी केली असून कोविड काळातील घसरणीनंतर २०२२ पासून अर्जासह मंजुरीचा वेग वाढला आहे.
सध्या दरमहा सरासरी तीन हजार नागरिकांचे पासपोर्ट मंजूर होत असून तेराही पोलीस ठाण्यांच्या तुलनेत आडगाव, सरकारवाडा व देवळाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पासपोर्ट नोंद करणाऱ्यांची संख्यानगण्य आहे. तर, अंबड पोलिसांच्या हद्दीतून प्रतिवर्षी सर्वाधिक पासपोर्ट (पारपत्र) मंजूर होत आहेत. सन २०२५ मध्ये आयुक्तालयाने ३७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांची पडताळणी केली. अंबड पाठोपाठ उपनगर पोलिसांच्या हद्दीत अधिक पासपोर्ट नोंदविले जात असून, हायप्रोफाइल लोकवस्तीचा इंदिरानगर व गंगापूर परिसर त्यापुढील क्रमांकावर आहे.
Chhagan Bhujbal: मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा, ईडीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया सुलभव जलद करण्यासह ‘झिरो पेन्डेन्सी’ची भूमिका आयुक्तालयाने घेतली आहे. दरम्यान, मक्का, मदिनासह अरब देशांत जाण्यासाठी अंबड, इंदिरानगर, उपनगर व मुंबईनाका हद्दीतील मुस्लिमबहुल भागातून पासपोर्ट नोंदणीचे प्रमाण अधिक असल्याचे नोंदीतून दिसते.
वर्षनिहाय मंजूर पासपोर्ट
सन २०१८ २८ हजार ९०१
सन २०१९ २७ हजार ७८६
सन २०२० १४ हजार २४०
सन २०२१ २० हजार ६४८
सन २०२२ ३२ हजार ६८४
सन २०२३ ३४ हजार ७०४
सन २०२४ ३५ हजार
सन २०२५ ३७ हजार ५३२
एकूण २,३१, ४९५
सन २०२५ मधील नोंदणी
पोलीस ठाणे पासपोर्ट
अंबड ४९०७
उपनगर ०३८८
इंदिरानगर ४२७५
गंगापूर ४२५०
मुंबई नाका ४०२७
पंचवटी ३०१०
भद्रकाली २४७२
नाशिकरोड २२८९
म्हसरूळ १६७७
सातपूर १६२२
सरकारवाडा १५५८
आङगाव १४९४
देवळाली कॅम्प १४९१




