Sunday, September 27, 2026
Homeजळगावकजगाव-वाडे गटात वैशालीताईंना मतदारांचा मिळतोय प्रतिसाद

कजगाव-वाडे गटात वैशालीताईंना मतदारांचा मिळतोय प्रतिसाद

पाचोरा । प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यासह भडगाव तालुक्यातुन ही विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांनी विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवुन मुसंडी मारत प्रचारात आघाडी घेतली आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव-वाडे जिल्हा परिषद गट वैशालीताई सुर्यवंशी यांनी पिंजुन काढत प्रचार रॅली, कार्नर सभा, मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपले आशिर्वाद हे मतपेटीद्वारे द्यावे अशी हाक वैशालीताई सुर्यवंशी यांनी मतदारांना दिली आहे.

- Advertisement -

त्यांच्या या हाकेला कजगाव-वाडे जिल्हा परिषद गटासह परिसरातील मतदार भरभरून प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे. स्व. आर.ओ.तात्या पाटील यांचे स्वप्न पुर्ण करण्याच्यासाठी वैशालीताई सुर्यवंशी ह्या पुर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. वैशाली ताईंची एकनिष्ठता बघुन आपोआपच मतदार त्यांना जुळायला लागले आहेत.

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने पुरुष, महिला, युवक, युवती सहभागी झाले आहेत. घरोघरी जाऊन वैशाली सुर्यवंशी यांनी मतदारांचे आशिर्वाद व शुभेच्छा घेतल्या. घरोघरी वैशाली सुर्यवंशी यांचे महिलांनी औक्षण करुन हळदी कुंकू लावुन, फुलांचा वर्षाव करुन जणु काही विजयाचा आशिर्वाद देत असल्याने वैशाली सुर्यवंशी भारावुन गेल्या आहेत. कजगाव येथील प्रचार रॅलीत दीपक पाटील, जे.के.पाटील, गोरख पाटील, महेंद्र दादा, दिनू महाराज, रतन परदेशी, विजय साळुंखे, दत्तु मांडोले, राजू चव्हाण, अनिल महाजन, दिनेश पाटील, भाऊसाहेब पाटील, नवल अप्पा, समाधान पाटील, विकास पाटील, भालचंद्र पाटील, बेबा ताई पाटील, गायत्री पाटील, चेतन पाटील यांचेसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...