Saturday, May 18, 2024
Homeधुळेसहा विवाहितांचा सासरी छळवाद; 25 जणांवर गुन्हा

सहा विवाहितांचा सासरी छळवाद; 25 जणांवर गुन्हा

धुळे dhule । प्रतिनिधी

जिल्ह्यातील सहा माहेरवाशिनींचा (Mahervasini) सासरी (father in law) विविध कारणावरून छळ (torture) करण्यात आला. प्रसंगी त्यांना मारहाण (beating) देखील करण्यात आली. याप्रकरणी एकुण सहा तक्रारींवरून 25 जणांवर वेगवेगळ्या पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

चारित्र्याचा संशय घेण्यासह माहेरून पैसे आणावे म्हणून साक्षी राहुल भामरे (वय 22 रा. प्लॉट नं. 32 रा. ह.मु 39 अ विशाल सोसायटी, साक्री रोड, धुळे) या विवाहितेला पती राहुल दिनेश भामरे (रा. प्लॉट नं. 32 बालाजी नगर, एकता नगर जवळ, नकाणे रोड, धुळे) याने शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच छळ केला. त्यावरून धुळे शहर पोलिसात पती राहुलवर गुन्हा नोंद झाला आहे. पोना आखाडे तपास करीत आहेत.

दुसरी तक्रार सौ.दिपाली हितेश चौधरी (वय 30 रा.ह.मु लक्ष्मी नारायण कॉलनी, विरलेद रोड, शिंदखेडा) हिने शिंदखेडा पोलिसात दिली आहे. त्यानुसार लग्नात मानपान केला नाही व लग्न सुरत येथे केले. तसेच पहिली मुलगी झाली म्हणून तिचा पती हितेश दिलीप चौधरी, सासरे दिलीप भगवान चौधरी, सासु पुष्पाबाई दिलीप चौधरी (रा. रामनगर गेट, शांतीनगरजवळ, निलगिरी सर्कल, उधना, सुरत) यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. माहेरून टाकून सांसारीक सुखापासून वंचीत केले. म्हणून तिघांवर गुन्हा नोंद झाला असून तपास पोहेकाँ पवार करीत आहेत.

पुजा विशाल देसाई (वय 27 रा. ह.मु वडजाई पिंप्री ता. धुळे) या विवाहितेने बँकेचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणले नाही म्हणून तिचा पतीससह सासरच्यांनी छळ केला. शिवीगाळ करीत जिवे मारण्याचीही धमकी तिला दिली. याबाबत तिने मोहाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पती विशाल हिरालाल देसाई, सासु नंदाबाई हिरालाल देसाई, सासरे हिरालाल रोडू देसाई, दीर राहुल हिरालाल देसाई, सासर्याची बहिण छोटीबाई रोडु देसाई (रा. डुक्कर झिरे, दहिवेल ता. साक्री व हमु वडजाई पिंप्री, अन्वर नाला ता.धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ सोनवणे करीत आहेत.

तसेच मनिषा रूपेश जाधव (वय 23 रा. सुराय ता. शिंदखेडा) या विवाहितेच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिचा पती रूपेश नाना जाधव याचे एका तरूणीशी अनैतिक संबंध असल्याने तिचे पतीचे वारंवार वाद होत होते. त्यासह गाडी घेण्यासाठी माहेरून दोन लाख आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तिचा पतीसह सासरच्यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत जिवे मारण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी पती रूपेश जाधव, सासु अरूणाबाई नाना जाधव, सासरे नाना धोंडू जाधव, जेठ सुनिल नाना जाधव, अनिल नाना जाधव सर्व रा. मोंढाळे ता. पारोळा, नणंद कविता नितीन महाले, नंदोई नितीन गोविंद्र महाले रा. नेहरू नगर, देवपूर, जिज सासु अनिताबाई सुभाष महाले रा. रामबोरीस ता. धुळे यांच्याविरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोना ठाकुर तपास करीत आहेत. हिना जब्बार शेख (वय 20 रा. हाजीनगर, वडजाई रोड, धुळे) हिचा देखील सासरी छळ झाला.

मोटार सायकल घेण्यासाठी 50 हजार आणावे व तिच्या दवाखान्याचा खर्च माहेरून करावा, यासाठी तिला पती जब्बार फारूख खान, सासु मलिका बी शेख, सासरे शेख फारूख गफ्फार, नणंद नरगीस मुस्ताकीम शेख, तबस्सुम शेख फारूख सर्व रा. कोसाला आवास, सुभाष नगर, सुरत यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार तिने चाळीसगाव रोड पोलिसात दिली असून पाचही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. एएसआय पाटील तपास करीत आहेत.

सहावी तक्रार मनिषा बबन मारनर (वय 24 रा. गंगापूर ता. साक्री) या विवाहितेने साक्री पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार सासरी तिला पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. स्त्रीधन काढून घेत माहेरी हाकलून दिले. त्यावरून पती बबन चुडमाण मारनर, सासरे चुडामण बंडू मारनर, सासु सुमनबाई चुडामण मारनर, दीर वसंत चुडामण मारनर सर्व रा. तामसवाडी ता.साक्री यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोना विसपुते करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या