Saturday, May 4, 2024
Homeनगरमुठेवाडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 9 जागांसाठी 20 उमेदवार निवडणूक रिंगणात

मुठेवाडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 9 जागांसाठी 20 उमेदवार निवडणूक रिंगणात

माळवाडगाव (वार्ताहर) –

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये सरळ सरळ लढत होणार असून आज अर्ज

- Advertisement -

माघारीच्या अखेरच्या दिवशी 9 जागांसाठी 18 अधिक 2 अपक्ष असे एकूण 20 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

ग्रामपंचायत सत्ताधारी गटाचा बाजार समितीचे संचालक विश्वनाथ मुठे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनल विरूद्ध मुरकुटे गट आणि विखे-पाटील (भाजपा) युती असून भाजपा तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, मुरकुटे गटाचे शिवाजी मुठे आदींच्या नेतृत्वाखाली दुसरा पॅनल यांच्यात लढत होणार आहे. या दोन्ही गटांचे उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग- 1 अनिल रमेश मुठे, लता भाऊसाहेब मुठे, सुरेश दिनकर रूपटक्के (मुरकुटे-विखे गट), प्रकाश रघुनाथ मुठे, उज्वला आदिनाथ दिघे, गोरख सजन जाधव, (ग्रामविकास).

प्रभाग 2- शंकर ्वसंतरांव मुठे, निर्मला दिलीप मुठे , ताराबाई शंकर पाचपिंड (मुरकुटे-विखे) सागर ज्ञानदेव मुठे, निर्मला कैलास पाचपिंड, विजया बाबासाहेब भोंडगे (ग्रामविकास)

प्रभाग 3-ज्ञानेश्वर जयवंत मुठे, लता शिवाजी मुठे, लंका दिनकर मुठे (मुरकुटे-विखे). मारूती विनायक मुठे, वैशाली निवृत्ती मुठे, गायत्री बाबासाहेब मुठे (ग्रामविकास ) असे दोन्ही गटांचे 18 उमेदवार असून ज्ञानेश्वर तुकाराम बोरूडे (प्रभाग 3 अपक्ष) सुभाष कचरू चौधरी (प्रभाग 1अपक्ष) असे 20 उमेदवार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या