Saturday, July 27, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार : 5 तालुके झाले कोरोनामुक्त

नंदुरबार : 5 तालुके झाले कोरोनामुक्त

नंदुरबार Nandurbar/ प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हाभरात आज सात जण कोरोनामुक्त Corona free झाल्याने पाच तालुके तुर्त कोरोनामुक्त झाले असुन आता नंदुरबार येथे अवघा एक ऍक्टीव्ह रुग्ण आहे.यामुळे आता नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्तीच्या Corona free उंबरठ्यावर आला आहे.पाच तालुके कोरोनामुक्त झाले असले तरी आता नागरिकांनी बेफिकीरी करायला नको अशा प्रतिक्रीया सुजाण नागरिकांमधून उमटत आहेत.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यात काल दि.११ रोजी सात जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.यामध्ये तळोद्यातील १, अक्कलकुवा येथील ५ तर नवापूर येथील १ अशा सात जणांचा समावेश आहे.

यामुळे काल धडगाव व शहाद्यानंतर तळोदा,अक्कलकुवा व नवापूर असे पाच तालुके तूर्तास कोरोनामुक्त झाले आहेत. आता नंदुरबार तालुक्यात अवघा एक ऍक्टीव्ह रुग्ण असल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख २८ हजार ८२८ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील ३७ हजार ७०० जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले होते.यातील ३६ हजार ७४९ जण कोरोनामुक्त झाले असून ९५० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नंदुरबार शहरासह तालुक्यात सर्वाधिक ९२ हजार २११ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील १६ हजार २२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यातील १५ हजार ६३३ जण कोरोनामुक्त झाले असून ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहादा तालुक्यात ५८ हजार १८१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील ११ हजार ६८६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ११ हजार ४५१ जण बरे झाले आहेत तर २३५ जणांचा मृत्यू झाला आहे.तळोदा तालुक्यात २५ हजार २८५ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील तीन हजार ७८० जण पॉझिटिव्ह आढळून आले असून उपचारादरम्यान तीन हजार ६८१ जण बरे झाले आहेत तर ९९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नवापूर तालुक्यात २७ हजार ६५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील ४ हजार १४५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यातील ३ हजार ९६७ जण कोरोनामुक्त झाले असून १७८ जणांचा मृत्यू झाला आहे तर अक्कलकुवा तालुक्यात १० हजार २८८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यात एक हजार २०४ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून उपचारादरम्यान एक १७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तर धडगाव तालुक्यात नऊ हजार ३१३ चाचण्या करण्यात आले असून ८६३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यातील ८४० जण कोरोनामुक्त झाले असून २३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आता अवघा एक ऍक्टीव्ह रुग्ण असल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असला तरी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हाभरात आज सात जण कोरोनामुक्त झाल्याने पाच तालुके तुर्त कोरोनामुक्त झाले असुन आता नंदुरबार येथे अवघा एक ऍक्टीव्ह रुग्ण आहे.यामुळे आता नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आला आहे.पाच तालुके कोरोनामुक्त झाले असले तरी आता नागरिकांनी बेफिकीरी करायला नको अशा प्रतिक्रीया सुजाण नागरिकांमधून उमटत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात काल दि.११ रोजी सात जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.यामध्ये तळोद्यातील १, अक्कलकुवा येथील ५ तर नवापूर येथील १ अशा सात जणांचा समावेश आहे.यामुळे काल धडगाव व शहाद्यानंतर तळोदा,अक्कलकुवा व नवापूर असे पाच तालुके तूर्तास कोरोनामुक्त झाले आहेत.

आता नंदुरबार तालुक्यात अवघा एक ऍक्टीव्ह रुग्ण असल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आला आहे.नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख २८ हजार ८२८ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील ३७ हजार ७०० जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले होते.यातील ३६ हजार ७४९ जण कोरोनामुक्त झाले असून ९५० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नंदुरबार शहरासह तालुक्यात सर्वाधिक ९२ हजार २११ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील १६ हजार २२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यातील १५ हजार ६३३ जण कोरोनामुक्त झाले असून ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे.शहादा तालुक्यात ५८ हजार १८१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील ११ हजार ६८६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ११ हजार ४५१ जण बरे झाले आहेत

तर २३५ जणांचा मृत्यू झाला आहे.तळोदा तालुक्यात २५ हजार २८५ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील तीन हजार ७८० जण पॉझिटिव्ह आढळून आले असून उपचारादरम्यान तीन हजार ६८१ जण बरे झाले आहेत तर ९९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.नवापूर तालुक्यात २७ हजार ६५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील ४ हजार १४५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यातील ३ हजार ९६७ जण कोरोनामुक्त झाले असून १७८ जणांचा मृत्यू झाला आहे तर अक्कलकुवा तालुक्यात १० हजार २८८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यात एक हजार २०४ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून उपचारादरम्यान एक १७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.तर धडगाव तालुक्यात नऊ हजार ३१३ चाचण्या करण्यात आले असून ८६३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

यातील ८४० जण कोरोनामुक्त झाले असून २३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आता अवघा एक ऍक्टीव्ह रुग्ण असल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असला तरी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या