Saturday, May 4, 2024
Homeधुळेअडीच लाखांचा स्पिरीट साठा जप्त

अडीच लाखांचा स्पिरीट साठा जप्त

शिरपूर – Shirpur – प्रतिनिधी :

खैरखुटी वनक्षेत्रातून 2 लाख 46 हजार रुपये किंमतीचे 1200 लिटर स्पिरिट साठा पोलिसांनी जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

तालुक्यात बनावट दारू निर्मितीसाठी मध्यप्रदेशातून अवैधरित्या वाहतूक करून खैरखुटी वनक्षेत्रात स्पिरिट साठा लपवून ठेवला असल्याची गोपीनय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी कारवाई करण्यासाठी पथक तयार केले.

शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे पीएसआय नरेंद्र खैरनार, पोहेकॉ लक्ष्मण गवळी, पोकॉ योगेश मोरे, पोकॉ शाम पावरा तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्ती पथकातील पोना अशोक पाटील,पोकॉ मयुर पाटील यांच्या पथकाने खैरखुटी परिसरातील वन क्षेत्राची तपासणी केली असतांना नाल्याचे काठी पोलीसांना पाहून एका व्यक्तीनेे पळ काढला.

पोलिसांना संशय आल्याने पथकाने संशयितांचा पाठलाग करून पोकॉ. शाम पावरा यांनी त्याला पकडले. व त्याची पोलीस पथकाने चौकशी केली असता त्याचे नाव शामु भगत असे त्याने सांगितले. मातीच्या झोपडीमध्ये त्याच्या ताब्यातील 2 लाख 46 हजार रुपये किंमतीचे एकुण सहा बॅरेल मध्ये ठेवलेले प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे 1200लिटर स्पिरीटसाठा जप्त केला. सदर स्पिरिट साठ्यासह संशयित शामु भगत रा. पळासनेर याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोकॉ योगेश दाभाडे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 65 ए व ई प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या