Saturday, September 14, 2024
Homeनाशिकदिंडोरीत कडकडीत बंद; साखळी उपोषण सुरु

दिंडोरीत कडकडीत बंद; साखळी उपोषण सुरु

दिंडोरी | प्रतिनिधी

- Advertisement -

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार ठोस भुमिका घेत नसल्याने मराठा समाजाच्या वतीने गावोगावी राजकीय पक्ष व नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ झाला आहे. मंगळवारपासून दिंडोरी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण मराठा समाज बांधवांच्या वतीने सुरु झाले आहे.

अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी होत आहे. परंतू शासन त्यावर कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. मराठा समाज हा मागास व आर्थिक दुबल असल्याने मराठा समाजासाठी तरुण, तरुणी यांना शैक्षणिक, नोकरीसाठी आरक्षण नसल्यामुळे चांगले शिक्षण घेणे दुरापास्त झालेले आहे. तसेच नोेकरी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत मागणी होत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

दिंडोरी शहर कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी व्यापार्‍यांनी आपली दुकाने स्वयस्फुतीने बंद ठेवून बंद ठेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. आरोग्य सेवा मात्र सुरळीत सुरु होती. यात मेडीकल, दवाखाने, पशुखाद्य दुकाने आदींचा समावेश होता.

त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने साखळी उपोषण सुरु केले आहे. याप्रसंगी सोमनाथ जाधव, नितीन देशमुख, रवी जाधव, गणेश आंबेकर, सागर वसाळ, प्रतिक जाधव, सुजित मुरकूटे, कैलास पाटील, तुकाराम जोंधळे, रविंद्र शिंदे, सुरेश देशमुख, सागर जाधव, प्रदिप घोरपडे, गणेश बोरस्ते, राहुल गटकळ, मनोज मवाळ, गंगाधर निखाडे, सचिन देशमुख, कृष्णा मातेरे.

तसेच, अविनाश जाधव, दिपक जाधव, तुषार वाघ, सचिन जाधव, निलेश पेलमहाले, तुषार मवाळ, संजय जाधव, अशोक भोसले, गणेश खांदवे, विशाल कदम, शिवनाथ कांदेकर, मनोज घडवजे, अनिल वाघचौरे, नीलेश गायकवाड, पंकज देशमुख, गणेश दुगजे, विशाल कदम, योगेश जाधव, उल्हास जाधव, आर. के. खांदवे, गोविंद निमसे, रघुनाथ गायकवाड, अमोल देशमुख, मंगेश जाधव, संतोष केंदळे, राकेश शिंदे आदी उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या