चाळीसगाव । प्रतिनिधी
महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व मित्र पक्षांतील माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान मंत्री, खासदार, माजी आमदार यांच्यासह सर्वच आजी-माजी लोकप्रतिनिधीं, पदाधिकारी व कार्यकर्ते हे मैदानात उतरले आहेत. या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विजयाचा निश्चय केला आहे. महायुतीचे भाजपा व मित्र पक्षाचे सर्वच शिलेदार हे आपण स्वतः मंगेश व उमेदवार देखील आहोत अशा भावनेने प्रचारात उतरले आहेत.
माजी केंद्रीय राज्यमंत्री एम के आण्णा पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खा. स्मिताताई वाघ, तीन वेळा तालुक्याचे आमदार राहिलेले प्रा.साहेबराव घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती पोपट भोळे, राज्य महिला आयोगाच्या मा.सदस्या देवयानीताई ठाकरे, बाजार समिती सभापती मच्छिंद्र राठोड, जिल्हा उपाध्यक्ष के.बी.साळुंखे, राजेंद्र राठोड यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल निकम ,शहराध्यक्ष नितीन पाटील, यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते नेते बाळासाहेब राऊत, धर्मा रामा वाघ, सुरेश तात्या सोनवणे, सुरेश स्वार, राजेंद्र चौधरी, मच्छिंद्र राठोड, सतीश पाटे, पीयुष साळुंखे, नवल पवार यांच्या बरोबरच महायुतीचे भाजप व मित्र पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती संचालक, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, विकासो चेअरमन-संचालक, शेतकी संघ संचालक, विविध आघाडी, मोर्चा पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, मित्रपरिवार, नातेवाईक आणि सर्वसामान्य कार्यकर्ते अशी भली मोठी प्रचाराची फळीच मतदारसंघात मंगेश दादांच्या प्रचात सहभागी झाली आहे. एकंदरीत बघता हि निवडणूक मंगेश चव्हाण यांच्या विजयाकडे वाटचाल करीत आहे असे चित्र निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
तसेच प्रचारादरम्यान ज्या गावात जातील त्या गावातील जिल्हा परिषद गट सदस्य, पंचायत समिती गण प्रमुख उपस्थित राहतात. ग्रामीण भागातील जनतेकडून या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे भव्य स्वागत ठीकठिकाणी होत आहे. जनतेबरोबर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी देखील आता ही निवडणूक आपली निवडणूक म्हणून हातात घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.