Friday, May 3, 2024
Homeजळगावजवखेडा येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

जवखेडा येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

अमळनेर – प्रतिनिधी Amalner

तालूक्यातील जवखेडा येथील इंग्रजी माध्यमची शाळा शेत जमिनिवर असल्याची महसूल विभागाच्या दंडाबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्याच्या बदल्यात जवखेड़ा ता.अमळनेर, येथील तरूणाच्या तक्रारी वरून तलाठ्याला १५ हजाराची लाच घेतांना लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी साफळा रचून रंगेहात पकडल्याची घटना आज दि.१३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जवखेडा येथील तलाठी कार्यालयात घडली.

- Advertisement -

सदर लाचखोर तलाठी मुकेश सुरेश देसले, वय-४४, रा.प्लॉट नं.५४, सुर्या नगर, नकाना रोड, आधार नगरजवळ, धुळे यास १५ हजार रूपये रोख घेतांना लाच लूचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली जवखेडा येथील शेतजमिनीवर असलेली शाळेला आलेला दंड ३२ हजार ४२६ रूपये त्यांनी भरला मात्र त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे मोबदल्यात तलाठी मूकेश यांनी लाचेची मागणी केली होती.

आरोपी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून. सदर लाचेची रक्कम आरोपी यांनी आज दि.13 रोजी तलाठी कार्यालय,जवखेडा येथे पंचासमक्ष स्वीकारली. सापळा व मदत पथकात लाच लूचपत पोलीस अधिकारी गोपाल ठाकुर, पो.नि.निलेश लोधी, संजोग बच्छाव, सफौ.रविंद्र माळी, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. सुरेश पाटील, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ. प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांनी पोलीस अधिक्षक. सुनील कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधिक दिनकर पिंगळे, यांचे मार्गदशनाखाली कार्यवाही यशस्वी केली. या प्रकरणी पोलीसात गून्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या