धुळे | प्रतिनिधी Dhule
तालुक्यातील धामणगाव शिवारातील तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे असलेले दोन शेत गटांचे सातबारा उतार्यावर बँकेचा पिक कर्जाचा बोजा चढविण्यासाठी शासकीय फिसह ७०० रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी धामणगाव (वणी खुर्द) तलाठी व सध्या धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात कार्यरत महेंद्र वामनराव धाकड (वय ५७) यांना धुळे एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत.
- Advertisement -
वरिष्ठाचे आदेशानंतर आज दुपारीही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान यापुर्वी एसीबीच्या पथकाने सापळा कारवाई केली. मात्र महेंद धाकड यांना कारवाईचा सुगावा लागल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारली नव्हती.