Sunday, September 15, 2024
Homeजळगावमनपाच्या ओपन स्पेसमधील अनधिकृत इमारत निष्कासीत

मनपाच्या ओपन स्पेसमधील अनधिकृत इमारत निष्कासीत

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील मोराती पेठ (Morati Peth) परिसरात राम मंदिराच्या समोरील मनपाच्या (Municipal Corporation) ओपन स्पेसमध्ये बांधलेली इमारत अनधिकृत (Unauthorized building) असल्याने कारवाई करण्यात यावी अशा आशयाची तक्रार (Complaint)लोकशाहीदिनी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेवून मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने (Department of Encroachment Elimination) शुक्रवारी जेसीबीच्या सहाय्याने इमारत जमीनदोस्त केली. ही इमारत प्रशासनाने तीन वर्षांपुर्वीच ताब्यात घेतली होती.

मारोती पेठेतील मनपाच्या ओपन स्पेसमध्ये इमारत असल्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे करण्यात आली होती. तीन वर्षांपुर्वीच प्रशासनाने कार्यवाही करुन मनपाच्या ताब्यात घेतली होती. दरम्यान, इमारत पाडून ओपन स्पेस खुला करावा. अशी तक्रार लोकशाहीदिनात करण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेवून, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने जेसीबीच्या सहाय्याने इमारत जमीनदोस्त करुन ओपन स्पेस मोकळा केला. सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरु होती. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे लिपिक संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, किशोर सपकाळे यांच्यासह पथकाने केल्याची माहिती संजय ठाकूर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या