Tuesday, May 21, 2024
Homeनाशिक'निमा'च्या दिंडोरी येथील कार्यालयाचे उद्घाटन

‘निमा’च्या दिंडोरी येथील कार्यालयाचे उद्घाटन

नाशिक / दिंडोरी । प्रतिनिधी Nashik/Dindori

एमआयडीसीतर्फे दिंडोरी तालुक्यात आत्ता झालेल्या भूसंपादनाच्या व्यतिरिक्त निमाच्या व अनेक उद्योजकांच्या मागणीवरून येणार्‍या काळात उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात जागा संपादित करण्यात येणार असून त्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जांबुटके येथे आदिवासी भागातील उद्योजकांना व लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष एमआयडीसी होउ घातली आहे. अकराळे येथे एमआयडीसी मार्फत लवकरात लवकर निमाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यास उद्योग मंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या दिंडोरी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गवळी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, डी. जी. जोशी, अण्णासाहेब देशमुख, रमेश वैश्य, मनिष कोठारी, दिंडोरीचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उद्योजक आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत बनकर, दिंडोरी कार्यालय उपससमितीचे अध्यक्ष नितीन वागस्कर, को- चेअरमन योगेश पाटील, सदस्य माधवराव साळुंखे, एचएएलचे वरिष्ठ अधिकारी जावेद अली, उमेश कोठावदे, आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, वरूण तलवार, निमा कार्यालयासाठी तळेगाव येथे जागा उपलब्ध करून देणारे योगेश पाटील, विवेक पाटील आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी बोलतांना निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले की, औद्योगिक विकासासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करून जिल्ह्याची आगळी ओळख निर्माण करूया. औद्योगिक क्षेत्रात नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्याही औद्योगिक क्षेत्रामध्ये कुणाचीही झुंडशाही, दादागिरी, खंडणी खोरी व दबंग गिरी खपवून घेतली जाणार नाही. त्याचा संघटितपणे मुकाबला केला जाईल. औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जागा आरक्षित करण्यात येत असल्याने येथे मोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना चांगली संधी असून दिंडोरी तालुक्यात मोठे प्रकल्प होऊ घातले आहेत ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने निश्चितच भूषणावरअसल्याचेही बेळे यांनी स्पष्ट केले. आणि यामुळेच नियमाने दिंडोरी तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून येणार्‍या गुंतवणुकी करता दिंडोरीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

दिंडोरी कार्यालय म्हणजे निमाच्या वाटचालीचा महत्वाचा टप्पा आहे. जेथे औद्योगिक वसाहती आहेत तेथे निमाने संपर्क कार्यालय सुरू करावीत, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे यांनी सांगितले. व निमा अध्यक्ष धनंजय बेळे व त्यांच्या टीमचे कौतुक केले. विधान परिषदेसाठी पदवीधर, शिक्षकांप्रमाणेच उद्योजकांचा ही मतदारसंघही हवा, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी अक्राळे ग्रामपंचायतचे सरपंच आणि तळेगावच्या ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच निमाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणारे विवेक पाटील आणि योगेश पाटील यांचाही यावेळी सत्कार झाला.

कार्यक्रमास निमाचे खजिनदार विरल ठक्कर, निमा हाऊस कमिटी चेअरमन राजेंद्र वडनेरे, गोविंद झा, संजय सोनवणे, सतीश कोठारी, मनीष रावल, संदीप भदाणे, किरण वाजे, सुरेंद्र मिश्रा, प्रवीण वाबळे, सुधीर बडगुजर, सचिन कंकरेज, नीलेश पटेल, किरण खाबिया, विश्वजीत निकम, किरण लोणे, मिलिंद इंगळे, रवी पुंडे, श्रीकांत पाटील, यश राठी, अखिल राठी, शशांक मनेरिकर, रवींद्र झोपे, संदीप जगताप, किरण शिंदे यांच्यासह नाशिक, सिन्नर, दिंडोरी तसेच जिल्ह्यातील 300 हून अधिक संख्येने उद्योजक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या