Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजनांदगावला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

नांदगावला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

नांदगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक | प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

नांदगाव येथील शिवसृष्टीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबरच नांदगाव नगरपलिकेच्या नवीन इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नांदगाव, जि. नाशिक येथे आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने प्रादेशिक पर्यटन विकास योजना, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक हेक्टर क्षेत्रात शिवसृष्टी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किशोर दराडे, आमदार सुहास कांदे, माजी खासदार संजय निरुपम, सामाजिक कार्यकर्त्या अंजुमताई कांदे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छ्त्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आहेत. ते राज्याची अस्मिता आहेत. भारताचा अभिमान आहेत. ते राज्याची श्रद्धा आहेत. राजकोट येथील घटना दुर्दैवी असून राज्य शासन आणि नौदलातर्फे लवकरच पुन्हा भव्य पुतळा उभारण्यात येईल. असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,नांदगाव शहरात सर्वात मोठा आणि ऐतिहासिक प्रकल्प उभारण्यासाठी झालेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला शोभेल अशी शिवसृष्टी तयार झाली आहे. ही शिवसृष्टी नांदगाव शहराच्या विकासाचा ऐतिहासिक टप्पा ठरेल. शिवसृष्टीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याचा महाराष्ट्रातल्या कोट्यवधी बहीणींना लाभ झाला आहे. आगामी काळात या योजनेचा निधी वाढविला जाईल. या योजनेच्या माध्यमातून अर्थ व्यवस्थेला चालना मिळेल. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. तसेच मुख्यमंत्री स्वयंम योजना सुरू केली. राज्याला विकास कामातून पुढे नेण्यात येत आहे. मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आमदार कांदे म्हणाले की, शिवसृष्टीच्या माध्यमातून नांदगावकरांचे स्वप्न साकारले आहे. या शिवसृष्टीत छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याची उंची ७१ फूट आहे. दुसऱ्या टप्प्यात शिवसंग्रहालय साकारण्यात येईल. करंजवण पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. नांदगाव करिता पाणीपुरवठा योजनाही लवकरच कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बापूसाहेब कवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यानिमित्त गायक, दिग्दर्शक, संगीतकार अवधून गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, गायिका वैशाली सामंत यांचा स्वर संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आभार मानले.

शिवसृष्टी प्रकल्पाविषयी

नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अद्ययावत स्मारक उभारण्याची मागणी आमदार कांदे यांनी केली होती. त्यानुसार चांदवड- मनमाड- नांदगाव- चाळीसगांव जळगाव रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ लगत गट क्रमांक २३/अ/२ मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या एक हेक्टर जागेत शिवसृष्टी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत प्रादेशिक पर्यटन विकास योजना, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, राज्य शासन तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण चार कामांच्या १२ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच तांत्रिक मान्यता व निविदेची कार्यवाही पूर्ण होऊन सात कोटी रुपये रकमेची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यात मिनी थिएटर, अॅॅम्पी थिएटर, शिवाजी महाराजांचे प्रेरणा देणारे प्रसंग, सभोवताली कारंजे आदि व्यवस्था करण्यात आली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसृष्टीची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...