Saturday, September 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लाेकार्पण

Nashik : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लाेकार्पण

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

शहरांना मुलभूत सोयीसुविधा पाहिजेच, मात्र त्याचवेळी सामान्यांच्या विरुंगुळ्यासाठी सुसज्ज उद्यानही हवे. उद्यानात येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा मिळेल, युवकांना ऊर्जा मिळेल असे हे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान आहे. यासाठी सरकार काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाेलतांना दिली.

गंगापूर रोड परिसरातील हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, सिडकोचे अध्यक्ष व आमदार संजय शिरसाठ, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, माजी मंत्री बबनराव घोलप, विजय करंजकर, भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे विविध पैलू उलगडणारे हे स्मृती उद्यान आहे. उद्यानातील साहसी खेळ, कलादालन, सॉफ्टस्कील प्रशिक्षण, वाचनालय, इ-वाचनालय हे नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरेल, जागतिक दर्जाचे हे उद्यान असून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला आहे. शहराचा विकास म्हणजे पायाभूत सुविधा, रस्ते, इमारती असा होत नाही तर सर्वसामावेश विकास करीत असताना सर्वसामान्यांना विरुंगुळा वाटावा, उद्यान म्हणजे ऑक्सिजन सेंटर असावे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविक करताना साडेसात एकरात वसलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाची माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या