Saturday, May 18, 2024
Homeनाशिककरन्सी नोट प्रेसमध्ये आधुनिक यंत्रांचे उद्घाटन

करन्सी नोट प्रेसमध्ये आधुनिक यंत्रांचे उद्घाटन

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

देशाची शान असलेल्या येथील करन्सी नोट प्रेसमध्ये (सीएनपी) currency note press सुमारे अडीचशे कोटी खर्च करून उभारलेल्या नोट प्रिटिंगच्या आधुनिक मशिनरीचे modern machinery of note printing उदघाटन केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष सचिव मीरा स्वरुप Special Secretary to the Union Ministry of Finance Meera Swarup आणि खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

- Advertisement -

या उदघाटन कार्यक्रमाला विशेष सचिव मीरा स्वरुप, नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका तृप्ती पात्रा घोष, संचालक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल हे ऑनलाईन तर खा. हेमंत गोडसे, प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवार बाबू, महाव्यवस्थापक एस. महापात्र, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, जयराम कोठुळे, प्रवीण बनसोडे आदींची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

1925 साली आयएसपी-सीएनपी या सरकारी प्रेसचा नाशिकरोडला श्रीगणेशा झाला. 1962 साली नोटप्रेस स्वतंत्र जागेत कार्यान्वित झाली. सध्या येथे एक रुपयापासून पाचशेपर्यंतच्या नोटांची छपाई होते. या प्रेसमध्ये 1999 साली अखेरचे आधुनिकीकरण झाले होते.

उदघाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना जगदीश गोडसे म्हणाले की, अनेक संघर्ष, आंदोलने केल्यानंतर प्रेसला नवीन मशिनरी मिळाली आहे. नवीन आधुनिक मशिनरीमुळे नोटांचा दर्जा सुधारून वेस्टेजचे प्रमाण लक्षणीयरित्या घटणार आहे.

नोटबंदी काळात कामगारांनी एक वर्ष अविश्रांत मेहनत घेऊन नोट टंचाई दूर केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत प्रेसच्या पदाधिका-यांना बोलावून पाठ थोपटून विशेष सन्मान केला. त्यावेळी खासदार हेमंत गोडसे, जगदीस गोडसे यांनी नोट प्रेससाठी आधुनिक मशिनरी देण्याची मागणी केली.

पंतप्रधानांनी ती त्वरित मान्य केली. आज या नवीन मशिनरीचे उदघाटन झाल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जपान आणि जर्मन बनावटीच्या या मशिनरी आहेत. पुढील सहा महिन्यात चार सायमलटन मशिन व दोन सिंगल नोट मशिन नोट प्रेसमध्ये येणे अपेक्षित आहे. त्या आल्यावर एक वर्षात कार्यान्वित होतील. आयएसपी प्रेसमध्येही ई पासपोर्टची छपाई सुरु होणार असून त्यासाठी अत्याधुनिक मशिनरीची मागणी करण्यात आली आहे. दोन वर्षात दोन्ही प्रेसचे आधुनिकीकरण होईल, अशी प्रक्रिया सुरु झाली आहे.

प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे म्हणाले की, नाशिकरोडचे वैभव असलेल्या या प्रेसमध्ये आधुनिकीकरण अत्यंत गरजेचे होते. प्रेस सक्षम करण्याचे काम आम्ही केले. त्याचा लाभ पुढील पिढीला होणार आहे. प्रेस मजदूर संघाचे माजी उपाध्यक्ष व सेवानिवृत्त सुनिल आहिरे म्हणाले की, 1999 साली प्रेसचे आधुनिकीकरण झाले त्यानंतर आता 22 वर्षांनी आधुनिकीकरण झाले आहे. तेव्हाही आमच्या कामगार पॅनलची सत्ता होती. आत्ताही कामगार पॅनलचीच सत्ता आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला प्रेस मजदूर संघाचे खजिनदार अशोकराव पेखळे, रमेश खुळे, संतोष कटाळे, राजू जगताप, इरफान शेख, अविनाश देवरूखकर, अशोक जाधव, योगेश कुलवधे, बाळासाहेब ढेरिंगे, राहुल रामराजे, बबन सैद, अन्ना सोनवणे, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, रौफ शेख, शंतनु पोटींदे आदींसह पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या