Tuesday, May 28, 2024
Homeमुख्य बातम्यानवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोचे आज उद्घाटन

नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोचे आज उद्घाटन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दैनिक ‘देशदूत’ ( Daily Deshdoot)आयोजित व ललित रुंगटा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (Lalit Rungata Builders & Developers )प्रस्तुत ‘नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ ( New Nashik Property Expo-2023)च्या माध्यमातून सामान्यांचे गृहस्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिली आहे. आज (दि. 3) सायंकाळी 5 वाजता एक्स्पोचे उदघाटन होणार असून, कार्यक्रमास ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, नरेडको नाशिक अध्यक्ष अभय तातेड तसेच ललित रुंगटा ग्रुपचे संचालक अभिषेक बुवा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

आजपासून रविवार (दि. 5 मार्च) पर्यंत उत्तम नगर, अंबड लिंकरोड येथील भोळे मंगल कार्यालयाच्या प्रशस्त हॉलमध्ये भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व नागरिकांना येथे खुला प्रवेश असेल. पाहिले घर घेऊ इच्छिणार्‍यांसाठी तसेच सध्या घर असलेल्या परंतु, नव्या घराच्या शोधात असलेल्यांसाठी या प्रदर्शनात अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

भविष्यातील ‘स्मार्ट सिटी’ बनण्यासाठी नाशिकची वाटचाल सुरू असतांना नाशिक शहरातील नवीन नाशिक परिसराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स असो वा सुपर मार्केट, शाळा, महाविद्यालये, व्यवस्थापन महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मोठमोठे हॉटेल्स, भव्यदिव्य गृह व व्यावसायिक प्रकल्प, आसपासच्या गावांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग, रिक्षा बसच्या फेर्‍यांसह शहरातील कोणत्याही भागात थेट जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी, झपाट्याने विस्तार होणार्‍या या भागात सर्वकाही उपलब्ध आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एन्ड पर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते.

मागील काही वर्षांपासून नाशिकमध्ये अनेक नव्या संधी येत आहेत. रस्ते, रेल्वेमार्ग तसेच हवाई मार्गाने शहराची कनेक्टीव्हिटी वाढत आहे. याशिवाय अंतर्गत वाहतुकीसाठी प्रस्तावित निओ मेट्रो, आय टी पार्क, लॉजिस्टीक पार्कसारखे प्रकल्प यणार आहेत. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

प्लॉट्स, घरे आणि दुकाने या सर्व गृह तसेच व्यावसायिक प्रकल्पांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात नाशिक शहरातील नामांकित बिल्डर्स सहभागी होणार आहेत. तीन दिवसात दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भाग्यवान विजेत्यास साई संस्कृती पैठणीतर्फे सेमी पैठणी व मलाबार गोल्ड अँड डायमंडतर्फे व चांदीची 3 नाणी मिळणार आहेत. साई संस्कृती पैठणी व मलाबार गोल्ड अँड डायमंडस् हे गिफ्ट पार्टनर आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन आपल्या गृहस्वप्नपूर्ती कडे पाऊल टाकावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या