Tuesday, October 22, 2024
HomeनाशिकNashik News : उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या वन्यप्राणी उपचार केंद्राचे मंत्री भुसेंच्या हस्ते...

Nashik News : उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या वन्यप्राणी उपचार केंद्राचे मंत्री भुसेंच्या हस्ते लोकार्पण

नाशिक | Nashik

नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असून या परिसरातील वन्यप्राणी (Wildlife) व पक्षी यांच्यासाठी रुग्णालय तसेच जखमी वन्यप्राणी व पक्षी यांचे उपचारासाठी अपंगालय बांधण्याची आवश्यकता होती. जखमी वन्यप्राणी वाघ, बिबटे, कोल्हा तसेच गिधाडे, मोर व इतर पक्षी ईत्यादींसाठी शस्त्रक्रियागृह व उपचार झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करुन निसर्गाच्या सानिध्यात सोडणे या प्रक्रिया राबविणेपर्यंत त्यांना याठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे पिंजरे बसविण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : महायुतीत वादाची ठिणगी! नांदगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने ठोकला दावा; समीर भुजबळ मैदानात?

या प्रकल्पाचे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. राहुल ढिकले, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्राच्या माध्यमातून निसर्गाचा समतोल राखण्यास व संवर्धन होण्यास मदत होईल. या ठिकाणी तब्बल एक हेक्टर परिसरात वन्यप्राणी उपचार केंद्र उभारण्यात आले असून वन्यप्राण्यांवर उपचार करणे सोयीस्कर होणार आहे. यासाठी ३६४.८६ लक्ष निधी खर्च झाला आहे. यात प्रशासकीय इमारत, वन्य प्राण्यांसाठीचे शस्त्रक्रियागृह, पक्षी व प्राणी ठेवण्यासाठीचे पिंजरे उभारणे, संरक्षक भिंत इ. आवश्यक स्थापत्य कामे केले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Rain News : शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी; आजपासून जोर वाढणार

तसेच रस्ते अपघात किंवा अन्य कारणांनी जखमी झालेल्या प्राण्यांना उपचारासाठी (Treatment ) मुंबई (Mumbai) न्यावे लागत असे. मात्र, आता ही परवड थांबणार असून यामुळे अनेक प्राण्यांचे जीव वाचणार आहेत. १९९८ पासून नाशिकला वन्य प्राणी अपंगालय असावे यासाठी पाठपुरावा सुरू होता. एप्रिल २०२१ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर नाशिकमध्ये (Nashik) मंजूर झाले. म्हसरूळ फॉरेस्ट डेपोच्या जागेवर हा प्रकल्प आज दिमाखात उभा राहत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या