Monday, May 27, 2024
Homeनाशिक'या' तीर्थक्षेत्राचा सिहस्थ कुंभमेळा आराखड्यात समाविष्ट करा; दिनकर पाटील यांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

‘या’ तीर्थक्षेत्राचा सिहस्थ कुंभमेळा आराखड्यात समाविष्ट करा; दिनकर पाटील यांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इगतपुरी (igatpuri) जिल्ह्यातील कपिलधारा, कावनई तीर्थक्षेत्राचा येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळाच्या (Simhastha Kumbh Mela) आराखड्यामध्ये समाविष्ट करावा

- Advertisement -

या आशयाचे निवेदन (memorandum) जिल्हाधिकारी गंगाधर डी. (Collector Gangadhar D.) यांना फलहरी महाराज, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील (Former House Leader of Nashik Municipal Corporation Dinkar Patil), सतीश घैसास यांनी दिले आहे.

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) व नाशिक (nashik) येथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) पार पडतो. नाशिक जिल्हयांतील (nashik disrtict) इगतपुरी तालुक्यातील (igatpuri taluka) श्री कपिलधारा तीर्थ हे देखील एक सिंहस्थाचे मुळ स्थान आहे. या तीर्थास पुरातन काळापासून अनेक संतांनी तपश्चर्या, भेटी दिल्या आहेत. यात प्रामुख्याने श्री समर्थ रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, श्री गजानन महाराज हे प्रमुख संतांनी देखिल कपिलधारा तीर्थास भेट दिली आहे.

दर 12 वर्षांनी होणा-या सिंहस्थ कुंभमेळयासाठी राज्य सरकार तसेच केंद्र शासनाकडून आवश्यक असलेल्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात येत असतो. सदर कृती आराखडयामध्ये त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील कामांचा समावेश करण्यात येत असतो. श्री कपिलधारा तीर्थ हे पण सिंहस्थाचे मुळ स्थान असल्याने सन 2027 मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळयाच्या कृती आरखड्यामध्ये येथील कामांचा प्राधान्याने विचार करून समावेश करण्यात यावा.

श्री कपिलधारा तीर्था जवळच श्रीराम मंदिर शुक्ल तीर्थ असल्याने सदर स्थळास साधु, संत, महंत व भाविक मोठया प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणच्या कामाचा देखील प्राधान्याने विचार करून सन 2027 मध्ये होणा-या कुंभमेळयाच्या कृती आराखडयात समावेश करण्या यावा. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना फलहरी महाराज,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील,सतीश घैसास यांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या