नंदुरबार | प्रतिनिधी – nandurbar
आयकर आणि ईडी राजकीय कार्यकर्ते असल्यासारखे वागत असुन महाराष्ट्रात सध्या राजकीय टोळी युद्धसुरु असल्याने शेतक़र्यांची वाताहात होत आहे. त्यांचे प्रश्न बाजुला पडुन, सगळ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे कि आर्यन खानला जामीन कधी होणार आणि समीर वानखेडेवर नेमकी कारवाई काय होणार, बाकीचे प्रश्न किरकोळ वाटत असल्याने याला केंद्र आणि राज्यातील सत्तेत असलेले चारही पक्ष जबाबदार असल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खा.राजु शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे दुसरी ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मा.खा.राजु शेट्टी नंदुरबार दौर्यावर होते.त्याप्रसंगी शहरातील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संबाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी श्री.शेट्टी म्हणाले की, आमच्यावर संस्कार असल्याने येणारी पिढी व्यसनाधिन व्हावी आम्हाला अस वाटत नाही त्यामुळे सधन होण्यासाठी गांजा लागवड करण्याची परवानगी मागण्याचा आतेताई पणा आम्ही करणार नाही.
मात्र शेतकरी गांजा लागवड करण्यासाठी का परवानगी मागत आहे याचा शासनाने अंतर्भुत विचार करण्याची गरज असल्याचे राजु शेट्टी यांनी सांगितले. फालतु बडबड करणा़र्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. माझ्या हाकेवर लाखो शेतकरी रस्त्यावर येतात यांचा तथाकथीत शेतकरी नेत्यांनी अंतर्मुख होवुन विचार करावा,त्यांच्या हाकेला शेतकरी धावुन का येत नाही याच त्यांनी आत्मपरिक्षण देखील करावे असा सदाभाऊ खोत यांचे नावे न घेता त्यांना शेट्टी यांनी टोला लगावत.
मी कोण्या आमक्या बरोबर आहे किवां नाही या पेक्षाही मी फक्त शेतक़र्यांसोबत आहे असे सांगितले. शेतक़र्यांच्या वीज कंपनीकडुन वीज कनेक्शन कापल्याजात असल्याविरोधात त्यांनी आक्रमक भुमिका घेत स्वाभीमानी या प्रश्न रस्त्यावर उतरुन वेळ प्रसंगी शेतक़र्यांच्या संरक्षणासाठी कायदा हातात घेण्याची भुमिका जाहीर केली आहे. असे यावेळी राजु शेट्टी यांनी सांगीतले.