Thursday, March 27, 2025
Homeमनोरंजनआयकर विभागाच्या रडावर बॉलीवूड

आयकर विभागाच्या रडावर बॉलीवूड

मुंबई l Mumbai

आयकर विभागाने आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवल्याचं दिसत आहे. आयकर विभागाने मुंबईत अनेक बॉलिवूडकरांवर छापा टाकला आहे.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि निर्माता विकास बहल यांच्या विविध ठिकाणांवर आयकर विभागाच्या पथकाकडून छापा मारण्यात आला. या तिघांच्या मुंबईतील निवासस्थानी व कार्यालयावरही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांवर २०१५ मध्ये आलेल्या फँटम (Phantom) या सिनेमाशी संबंधित व्यवहारावरुन धाडी पडल्या आहेत. अनुराग कश्यप, विकास बहल आणि तापसी पन्नू यांच्या घरांची आयकर अधिकारी झाडाझडती करत आहेत. या कलाकारांनी आयकर चोरी केल्याचा संशय आहे आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयकर विभागाकडून होत आहे. अनुराग, विकास आणि मधू फँटम फिल्म्सचे संस्थापक आहेत. फँटमची मालकी अनुरागकडे आहे. मुंबई आणि पुण्यात २२ ठिकाणांवर सध्याच्या घडीला प्राप्तिकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

काय केल्यास कलह-आजार नाहीसे होतात ?

0
वास्तुशास्त्रानुसार घर बांधणे हे एक शास्त्र आहे. यात घराची दिशा आणि विविध गोष्टींचे स्थान यांचेही शास्त्र आहे, ज्याचा अध्यात्म आणि ग्रहांशी खोलवर संबंध आहे....