Sunday, March 30, 2025
Homeदेश विदेशलॉकडाउनमध्ये बाल लैंगिक शोषण आणि महिला हिंसाचारात वाढ

लॉकडाउनमध्ये बाल लैंगिक शोषण आणि महिला हिंसाचारात वाढ

सार्वमत

11 दिवसांत 92000 तक्रारी, चाईल्डलाईन इंडियाची माहिती
नवी दिल्ली – देशावरील कोरोना संकटामुळे सध्या लॉकडाउन असल्याने सगळ्यानाच घरात बसून राहावं लागतं आहे. धक्कादायक म्हणजे लॉकडाउनच्या या काळात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबरोबरच बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चाईल्डलाईन इंडिया हेल्पलाईनकडे 11 दिवसांच्या काळात तब्बल 92000 तक्रारी आल्या आहेत.

- Advertisement -

दुर्दैवी बाब म्हणजे घरातच बालकांना शोषणाचा सामना करावा लागत आहे. चाईल्डलाईन 1098 या हेल्पलाईनवर देशभरातून तब्बल तीन लाख 7 हजार तणावग्रस्त बालकांचे कॉल आले आहेत. लॉकडाउननंतरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 20 ते 30 मार्च या कालावधीत हे तक्रारींचे कॉल आले. 30 टक्के मुलांनी शौषण आणि हिंसाचारापासून संरक्षण मिळण्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे, चाईल्डलाईन इंडियाचे उपसंचालक हरलीन वालिया यांनी ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर बाललैंगिक शोषणाच्या आणि हिंसाचाराच्या तक्रारींसंदर्भात कॉल 50 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं. ही माहिती एका कार्यशाळेत जाहीर करण्यात आली. या कार्यशाळेला महिला बालविकास मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, असेही वालिया यांनी सांगितलं. दुसरीकडं लॉकडाउनच्या काळात महिला हिंसाचाराच्या घटनाही वाढल्या असल्याचं यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितलं होतं. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर या तक्रारींमध्ये दुप्पट वाढ झाल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

इतर तक्रारींसंर्दभातही कॉल – बाललैंगिक शोषणाच्या आणि हिंसाचाराच्या तक्रारींव्यतिरिक्त इतर तक्रारींसंर्दभातही कॉल चाईल्डलाईन इंडिया हेल्पलाईनकडे कॉल आले. यात शारीरिक आरोग्यासंर्दभात 11 टक्के, बाल कामगार 8 टक्के, बेपत्ता आणि घरातून पळून गेलेल्या मुलांसंदर्भात 8 टक्के तक्रारी आल्या दाखल झाल्या आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द; कारणही...

0
नाशिक | Nashik जिल्ह्यातील मालेगावात (Malegaon) २००८ साली बॉम्ब स्फोट झाला होता. या बॉम्ब स्फोटात (Bomb Blast) आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh...