Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनेत्र रुग्णसंख्येत वाढ

नेत्र रुग्णसंख्येत वाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

यंदाच्या पावसाळी हंगामात नाशिक व सभोवतालच्या परिसरात कंजंक्टिवाइटिसच्या केसेसमध्ये वाढ झालेली असून, या डोळ्यांच्या अत्यंत धोकादायक संसर्गाबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जाते आहे.

- Advertisement -

कंजंक्टिवाइटिसला सामान्यतः पिंक आय म्हणून ओळखले जाते. यामध्ये डोळ्यातील पांढरा भाग व आतमधील भागात विषाणूचा संसर्ग होत असतो. सामाजिक पातळीवर हा संसर्क झपाट्याने वाढण्याची भिती व्यक्त करतांना यासंदर्भात सावधगिरी व सामाजात जागृकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलतर्फे तज्ज्ञांनी कळविले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी ’कंजंक्टिवाइटिस’चा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत 12 ते 15 टक्के वाढ झाली आहे. बाह्य रुग्ण विभागास दैनंदिन भेट देणार्‍या रुग्णांपैकी 15 टक्के रुग्णांमध्ये ’कंजंक्टिवाइटिस’विषयक लक्षणे आढळून येत असून, त्यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात संसर्गाचा धोका असतो. कंजंक्टिवाइटिसचे उच्चाटन करण्यासाठी साध्या व सोप्या कार्यपद्धती अवलंबण्याची आवश्यकता आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना नियमितपणे हात धुण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

आपण सर्व मिळून या विषाणूचा पराभव करुन डोळ्यांच्या साथीला अटकाव करु शकतो, असे मत डॉ. शरद पाटील, मेडिकल डायरेक्टर, सुशील आय केअर, युनिट ऑफ डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पिटल नाशिक. यांनी व्यक्त केले.

कंजंक्टिवाइटिसच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी बचावात्मक उपाययोजनांचे प्राधान्याने पालन करणे आवश्यक आहे. नियमितपणे चेहरा धुणे, डोळ्यांना सातत्याने स्पर्श करण्याचे टाळण्यासह स्वच्छतेशी निगडीत सवयींचा अंगीकार करणे त्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉ.शरद पाटील, मेडिकल डायरेक्टर, सुशिल आय केअर अ युनिट ऑफ डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल, यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या