Tuesday, December 10, 2024
Homeनाशिकफसवणुक प्रकरणी नरेश कारडांच्या पोलीस पोलीस कोठडीत वाढ

फसवणुक प्रकरणी नरेश कारडांच्या पोलीस पोलीस कोठडीत वाढ

नाशिक | प्रतिनिधी

१ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुक प्रकरणी अटकेत असलेले नाशिकचे प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक तथा कारडा कन्स्ट्रक्शनचे चेअरमन नरेश कारडा यांना आज (दि. ३) पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात उभे करण्यात आले असता ५ नोव्हेंबर पर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान त्यांच्या विरुध्द तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता पर्यंत सुमारे २५ तक्रारी पोलिसांकडे आले आहे. नरेश कारडा यांच्यासह चौघांवर मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांपैकी नरेश कारडा यांना सोमवारी (दि. ३०) रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आले होते.

जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

दरम्यान याच गुन्ह्यातील संशयित तथा त्यांचे बंधू मनोहर कारडा यांनी दोन दिवसांपुर्वीच रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. तरी पोलीस इतर दोघांचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. कोठडीची मुदत संपल्याने आज नरेश कारडा यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. राहुल जयप्रकाश लोनावत यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

त्यानूसार चेअरमन नरेश कारडा, मॅनेजिंग डायरेक्टर मनोहर कारडा, देवेश कारडा व संदिप शहा यांच्यावर गुन्हा दाखल आहे. लोनावत यांनी नरेश कारडा यांच्या कारडा कन्स्ट्रकशनला डेव्हलपमेंटचे काम विश्वासाने दिले होते. त्या बांधकामाच्या बदल्यात लोनावतकडून कारडा यांनी १ कोटी २० लाख स्विकारुन बांधकाम देखील पुर्ण केले नाही तसेच ही रक्कम लोनावत यांना परत न करता त्यांनी मोठी आर्थिक फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

आकडा मोठा

नरेश कारडा यांच्याविरोधात शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे फसवणुकीसंदर्भात सुमारे २५ पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या असून, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर फसवणुकीच्या आकड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हा आकडा कोट्यावधी रुपयांमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे पोलिसांसमोर तपास करण्याचे कडवे आव्हान राहणार आहे. त्यामुळे कारडा कन्स्टक्शनकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या