Thursday, May 15, 2025
Homeधुळेधुळ्यात हूडहुडी ; सर्वात कमी तापमानाची नोंद

धुळ्यात हूडहुडी ; सर्वात कमी तापमानाची नोंद

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

दोन दिवसांपासून अचानक वाढलेल्या थंडीने (cold) धुळेकरांमध्ये चांगलीच हुडहुडी भरली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर किमान तापमान (temperature) 7 अंश सेल्सिअसवर आले आहे.

यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान आहे. उत्तर व ईशान्येकडून वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यामुळे तापमान घसरले आहे. काही दिवसांत आणखी हूडहुडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.

थंडीमुळे नागरिकांची क्रीडा संकुल, जिममध्ये व्यायामासाठी गर्दी होत आहे. राज्यात नाशिक, महाबळेश्वर (Nashik, Mahabaleshwar) येथील तापमानात मोठी घट झाल्यानंतर सर्वात निचांकी तापमानाची नोंद आज धुळ्यात झाली आहे. 7 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले असून हे सर्वात निचांकी तापमान असल्याचे सांगण्यात येत आहे.

यामुळे हुडहुडी चांगलीच वाढली आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे. धुळे शहरात २ नोव्हेंबर रोजी किमान तापमान ९ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन ते १३ ते १४ अंशांवर गेले.

तसेच कमाल तापमानही ३२ ते ३३ अंश होते. त्यामुळे गारठा कमी झाला होता. मात्र आता दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. गुरुवारी मध्यरात्री किमान तापमान ९ अंश होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर तापमान पुन्हा १ अंशाने घटून ८.२ अंशांवर आले. तर आज थेट 7 अंश तापमानाची नोंद झाली आहे. वाढल्या थंडीतही शहरातील विविध भागात नागरिकांची सकाळी फिरण्यासाठी गर्दी होत असून जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का?...

0
पुणे | Pune  काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात घ्या, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या (Supreme Court) या...