Thursday, May 15, 2025
Homeधुळेशिंदखेड्यात रुग्णसंख्येत वाढ

शिंदखेड्यात रुग्णसंख्येत वाढ

शिंदखेडा – Shindkheda – प्रतिनिधी :

- Advertisement -

शिंदखेडा शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामुळे चिंता वाढली आहे.शिंदखेडा शहर व कॉलनी परिसरात कोरोनाने शिरकाव झाला आहे. पण नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नगरपंचायत स्तरावरून फवारणी होणे गरजेचे असतांना फारसे लक्ष दिले गेले नाही. पहिला रुग्ण बि.के. देसले नगर मध्ये आढळून आला. मात्र संबंधितास उपचारार्थ नेले नाही संबंधित रुग्ण घरीच आहे. मात्र त्यांच्या घरातील इतर सदस्यांनी फारशी दखल घेतली नाही. ते इतराच्या संर्पकात आले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

संध्याकाळी या भागातील रस्ता सुरक्षित असल्याने फिरायला जाणार्‍यांची संख्या जास्त आहे. मात्र रस्त्याने जातांना मास्क वापरत नाही. या व्यतिरिक्त शेती कामासाठी शिरपूर तालुक्यातून मजुरांची गाडी येते ते कुणीही मास्क वापरत नाही. त्यांच्या बाबत कोणीही दखल घेत नाही त्याचाही परिणाम कोरोना रुग्णवाढीत होत असावा अशी भीती व्यक्त होत आहे.

सध्या शहरात सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकान व इतर व्यवसायास परवानगी आहे. मात्र काही टपरीधारक याला अपवाद आहेत. कुठलेही डिस्टनसिंग पाळले जात नाही.

रुग्ण संख्या वाढत आहे. पावसाळा सुरू आहे वातावरणात गारवा आहे साहजिकच प्रकृती बिघण्यास कारणीभूत ठरणारा आहे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच रहा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन नगरपंचायत सीईओ देवेंद्र परदेशी, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का?...

0
पुणे | Pune  काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात घ्या, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या (Supreme Court) या...