नाशिक । प्रतिनिधी Nashik
करोनाने ( Corona )पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचे आदेश महापालिका प्रशासन दिले आहेत. मनपाची (NMC)तयारीची महिती केंद्र सरकारच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिक महापालिकेने शहरात लसीकरण (Corona Vaccination )केंद्रांत वाढ केली आहे. चार केंद्रांऐवजी आता 12 केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. महापालिकेकडे सुमारे 16 हजार डोस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पाच हजार कोविशिल्ड तर पाच हजार कोरबीवॅक्स लसची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपर्यंत शहरात तीस ते चाळीस लस नागरिक घेत होते, त्याच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांत सुमारे साडेतीनशे नागरिक रोज लस घेत आहेत. सध्या तरी नाशिक शहरात रुग्ण संख्या नसली तरी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे महापालिकेने तयारी सुरू केली आहे.
बिटको हॉस्पिटल तसेच डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल या ठिकाणी एकूण सुमारे 800 बेडची व्यवस्था होऊ शकते, त्याचप्रमाणे सुमारे 400 मॅट्रिक टन ऑक्सिजनचीदेखील उपलब्धता खासगी दवाखान्यांसह महापालिका करू शकते. याप्रमाणे मनपाची तयारी आहे.