Sunday, April 27, 2025
Homeनगरदारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ

दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ

राहाता (तालुका प्रतिनिधी)

दारणाच्या पाणलोटातील घाटमाथ्यावर गुरुवारी जोरदार पावसानंतर काल शुक्रवारी पावसाचा जोर काहिसा कमी झाला. काल सकाळी 6 वाजेपर्यंत मागील 24 तासात दारणात 308 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. दारणाचा साठा काल 72.32 टक्क्यांवर गेला तर भावली 82.57 टक्क्यांवर पोहचले होते. मुकणे 53.75 तर गंगापूर 45 टक्क्यांवर पोहचले होते.

- Advertisement -

गुरुवारी उशिरा दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 82 मिमी पाऊस झाला. भावलीला 100 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीलाही असाच पाऊस झाला. त्यामुळे दारणात व भावलीत नवीन पाण्याची चांगली आवक झाली. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 5170 दलघफू पाणीसाठा झाला आहे. 7 टिएमसी क्षमतेच्या या धरणात 5 टिएमसी साठा झाला आहे. भावलीत 125 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 1434 दलघफू क्षमतेच्या भावलीत 1184 दलघफू पाणी साठा झाला आहे. हा प्रकल्प 82.57 टक्के भरले आहे. मुकणेत 34 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे धरण 53.75 टक्के भरले. वाकी 16.29 टक्के, भाम 43.95 टक्के, वालदेवी 23.04 टक्के.

गंगापूर धरणाच्या परिसरात 25 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर मध्ये काल सकाळी मागील 24 तासात 81 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गंगापूर 44.90 टक्के भरले. गंगापूर मध्ये आतापर्यंत पाऊण टिएमसी नवीन पाण्याची आवक झाली. कश्यपी 25.05 टक्के भरले. गौतमी गोदावरी 23.18 टक्के, कडवा 30.33 टक्के, आळंदी 9.80 टक्के असे साठे धरणांचे आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “एकही पाकिस्तानी नागरिक…”; CM फडणवीसांचे मोठे विधान, नेमकं...

0
पुणे | Pune  देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) पाकिस्तानी लोकांना (Pakistani People) देश सोडण्याची नोटीस दिली आहे. त्यांना...