Sunday, September 15, 2024
Homeधुळेनवनवीन गोष्टी विकसित होण्यासाठी वाचन वाढवा- डॉ.मधुलिका सोनवणे

नवनवीन गोष्टी विकसित होण्यासाठी वाचन वाढवा- डॉ.मधुलिका सोनवणे

शिरपूर Shirpur । प्रतिनिधी

- Advertisement -

व्यावसायिक, सामाजिक लाभ या दोन्ही बाबींमध्ये संशोधन आवश्यक असून आपले संशोधन हे समाजोपयोगी (Research Sociology) असले पाहिजे. तसेच नवनवीन गोष्टी विकसित होण्यासाठी आपण वाचन (Reading) वाढवले पाहीजे आणि मुख्यत्वे आपल्या क्षेत्रातील मान्यवरांचे ब्लॉग वाचले पाहिजे, असे आवाहन केबीसीएनएमयू स्कूल ऑफ व्यवस्थापन अभ्यास, जळगावच्या (Director of KBCNMU School of Management Studies, Jalgaon) संचालिका डॉ. मधुलिका सोनवणे (Dr. Madhulika Sonawane) यांनी केले. प्रसंगी त्यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीत कौशल्य विकास आणि अद्ययावतीकरणाची गरज स्पष्ट केली.

खडसे, उध्दवांना महाजनी टोला

येथील एच.आर.पटेल फार्मसी महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या जीवन दीर्घ शिक्षण आणि विस्तार विभाग, केसीआयआयएल इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रोजगार आणि उद्योजकता कार्यशाळा 2023 व उद्योजकता विषयक नवनवीन कल्पनांचे पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यातील एकूण 215 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी यावेळी दिली.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची! पश्चिम रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवांशासाठी ही बातमी आहे महत्त्वाची : अनेक रेल्वेगाडया रद्द

राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. मधुलिका सोनवणे यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सलील पेंडसे, आर. सी. पटेल फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. जे सुराणा, प्रा. निलेश पाटील, राहुल बाविस्कर हे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. संजय बारी यांनी शिरपूर शहर, शिरपूर एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयाची ओळख उपस्थितांना करून दिली. प्रास्ताविक डॉ. आर. ई. मुथा यांनी केले. राष्ट्रीय कार्यशाळेच्या प्रथम सत्रात औरंगाबाद येथील सलील पेंडसे अँड असोसिएट्सचे सलील पेंडसे म्हणाले, रोजगारात मूल्यवर्धनांचा र्‍हास होत असून आपण त्याची नैतिकता जोपासली पाहिजे आणि उद्योजकता वर्धित करून त्याकडे वळले पाहिजे.

द्वितीय सत्रात स्वदेशी हस्तशिल्प प्रा.लि., आसरा इनोव्हेशन्स अँड मल्टीपर्पज फाउंडेशनचे संचालक आणि स्टार्टअप इंडियाचे मार्गदर्शक राहुल बाविस्कर यांनी लघु उद्योग सुरु करण्यासाठी व उद्योजकांच्या विकासासाठी आणि वाढीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याबाबत मार्गदर्शन करत त्यातून आपण कशी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याबाबत सांगितले.

बनावट वेब साईटच्या माध्यमातून व्यापार्‍याला दिड लाखांचा गंडा

तृतीय सत्रात आर.सी.पटेल पॉलिटेक्निकचे प्रा. निलेश पाटील यांनी उद्योजकता आणि रोजगारक्षमता विकसित करण्यासाठी विविध कौशल्यांचा विकास कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले.

20 पोस्टर्ससह 38 स्पर्धकांनी उद्योजकता कल्पना पोस्टर सादरीकरणात सहभाग घेतला. त्यात योगेश गोरख जाधव याने प्रथम पारितोषिक, हर्षदा पाटील व ऐश्वर्या ढोले यांनी द्वितीय पारितोषिक, रितिका पाटील हिने तृतीय पारितोषिक पटकावले. अक्षय धनराज वरसाळे व भूषण सोमनाथ चित्ते हे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले. विजेत्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

सहभागी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया नोंदवितांना महाविद्यालय विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि उद्योजकताभिमुख बनवण्यासाठी नेहमीच विवध चर्चासत्रे व कार्यक्रम आयोजित करत असते, त्यातून आम्हाला निश्चितच फायदा होतो तसेच कार्यशाळेच्या माध्यमातून भविष्यात उद्योजक बनून इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन कोळी व रितिका पाटील यांनी केले. आभार डॉ. आर.ई. मुथा व प्रा.व्ही.एस. बागुल यांनी मानले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ.आर.ई. मुथा आणि सहसमन्वयक (पोस्टर प्रेझेंटेशन) म्हणून प्रा.व्ही.एस. बागुल यांनी काम पहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या सर्व कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या